मुक्कामाच्या तयारीनेच मुंबईत या : राष्ट्रवादीच्या आमदारांना निरोप!

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
NCP Pune
NCP PuneSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि सहयोगी आमदारांना मुंबईत (Mumbai) मुक्कामासाठी राहण्याच्या तयारीनेच या, असा निरोप पक्षाकडून देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी हा निरोप आमदारांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (NCP MLAs instructed to come to Mumbai in preparation for stay)

राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होती. या बैठकीला येताना मुंबईत दोन ते तीन दिवस राहण्याच्या तयारीनेच या, अशी सूचना पक्षाचे प्रतोद अनिल पाटील यांनी पक्षाच्या आमदारांना केली होती. त्यामुळे शिवसेनेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीचेही आमदारही मुंबईत राहण्याची शक्यता आहे.

NCP Pune
लग्नाला म्हणून आला अन्‌ कोर्ट परिसरात येऊन पत्नीचा काटा काढला!

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एका एका आमदारासाठी दोन्ही पक्षाकडून जीवाचे रान करण्यात येत आहे. त्यातच स्वपक्षातील आमदार फुटू नयेत म्हणून विशेष दक्षताही घेतली जात आहे. शिवसेनेने आपल्या आमदारसह सहयोगी आमदारांनाही मुंबईतील हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे. शिवसेनेच्या आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी खासदार विनायक राऊत यांच्यावर देण्यात आलेली आहे.

NCP Pune
परिचारकांनी वाढविले समाधान आवताडेंचे टेन्शन; इच्छुकांना अर्ज भरण्याचे आदेश!

दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपल्या आमदारांनाही मुंबईत बैठकीसाठी बोलावले होते. त्या बैठकीला येताना मुंबईत दोन ते तीन दिवस राहण्याच्या तयारीनेच या, असा आदेश मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारांना दिल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि सहयोगी आमदारांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

NCP Pune
राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदारांसाठी महाडिकांनी अशी लावलीय फिल्डिंग!

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत वायसीएममध्ये येऊन भेट घेतली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटेाले यांचा त्यामध्ये समावेश होता. त्यांची राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com