राज्यपाल निघून जाताच विधानभवनाच्या पायऱ्यांवरच आमदाराचं 'खाली डोकं वर पाय'!

राज्यपाल कोश्यारी अभिभाषण थांबवून काही मिनिटांतच सभागृहातून निघून गेले.
Sanjay Daund
Sanjay DaundSarkarnama

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्याचा निषेध आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) करण्यात आला. राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याने ते अभिभाषण थांबवून काही मिनिटांतच सभागृहातून निघून गेले. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संजय दौंड (Sanjay Daund) यांनी खाली डोकं वर पाय असे आंदोलन केले.

विधानभवनाच्या पायऱ्यांवरच दौंड यांनी शीर्षासन केले. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून गेले. यातून त्यांनी राज्याचा अपमान केल्याचा निषेध करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचे सांगितले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दौंड हे बीडमधून राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आहेत. समाजकल्याण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीतर्फे संजय दौंड रिंगणात उतरले होते. त्यांची त्यावेळी बिनविरोध निवड झाली होती.

Sanjay Daund
भाजप, काँग्रेसला जमलं नाही ते एका हॉटेलवाल्यानं केलं; थेट महापालिकेवर एकहाती सत्ता

राज्याच्या अर्थसंकल्पीय (Maharashtra assembly budget 2022) अधिवेशनाला आजपासून (गुरूवार) सुरूवात होत आहे. यावेळी अभिभाषण करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी उभे राहिले. त्याचे भाषण सुरु होण्यापूर्वी सभागृहात घोषणाबाजी झाली. आपले भाषण अर्धवट सोडून ते तातडीने निघून गेले. यंदाचे अधिवेशन हे ठाकरे सरकारच्या काळातील सर्वाधिक कालावधीचे असे आहे. यंदा ३ मार्च ते २४ मार्च या कालावधीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे.

Sanjay Daund
मोठी घडामोड : दिशाच्या मृत्यूचे पुरावे नितेश राणे थेट न्यायालयात सादर करणार

'चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात रविवारी केले. छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याविषयी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांना कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com