राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात : थोडक्यात बचावले

NCP | sangram Jagtap : जगताप यांच्या BMW गाडीचा चकनाचूर
sangram Jagtap | Accident
sangram Jagtap | Accident Sarkarnama

मुंबई : अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीजवळ सकाळी साडेपाचच्या सुमारास अपघात हा अपघात झाला. या अपघातात जगताप थोडक्यात बचावले असून सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. सध्या ते मुंबई पोहचले असून पूर्णपणे सुखरुप असल्याची माहिती आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मुंबईच्या दिशेने जात असताना सकाळी साडेपाचच्या सुमारास आमदार जगताप यांची गाडी रायसनीजवळ पोहचली. यावेळी एसटीने जगताप यांच्या BMW गाडीला जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यात जगताप यांच्या गाडीचा अक्षरशः चकनाचूर झाला आहे. सुदैवाने आमदार जगताप सुखरुप आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com