आजोबांना कोरोनाचा संसर्ग होताच नातू रोहित पवार यांची भावनिक पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Rohit Pawar, Sharad Pawar
Rohit Pawar, Sharad PawarSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशात कोरोनाचे (Covid 19) संक्रमण सुरू झाल्यानंतर अनेक प्रमुख नेते कोरोनाच्या संसर्गामुळे क्वारंटाईन होत होते. काही अद्यापही विलगीकरणात आहेत. याला शरद पवार हे अपवाद होते. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत त्यांना संसर्ग झाला. हे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अनेक नेत्यांनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छाही दिल्या.

शरद पवार यांचे नातू व राष्ट्रवादीचे (NCP) युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आजोबांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच ट्विटरवर भावनिक पोस्ट केली. 'आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या ट्विट ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय... योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत,' असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Rohit Pawar, Sharad Pawar
बहुतांश नेते कोरोनाबाधित होत असताना शरद पवारांनी दोन वर्षे असं चकवलं होतं...

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी दुपारी फोनवरून पवारांशी संपर्क साधला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पवारांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. पवारांच्या तब्येतीला लवकर आराम मिळावा, अशा शुभेच्छा त्यांना सर्व स्तरांतून मिळत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे ट्विट पवारांनी केले आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांना खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांचे वय, त्यांनी कर्करोगावर केलेली मात, त्यांची औषधे अशी संकटे असतानाही त्यांनीही कोरोनाला गेल्या दोन वर्षांत आपल्या आसपास फिरकू दिले नाही. उलट वेळ मिळेल तसे ते कार्यक्रमांना जात राहिले. लोकांना भेटत राहिले. सार्वजनिक कार्यक्रम असो की कोणाच्या घरी सांत्वनाला जायचे असो तिथे ते दिसू लागले. अनेक नेेते घरात असताना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ते सरकारला सूचना देऊ लागले. त्यामुळे त्यांनी कोरनाला दूरच ठेवल्याची स्थिती होती. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत त्यांना त्याचा संसर्ग झाला.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त होती. तेव्हा संसर्ग झालेल्यांना त्याचा त्रासही फार झाला. धनंजय मुंडे यांच्यासारख्या तरुण आणि फिटनेसबाबत जागृत असलेल्या नेत्यालाही कोरोनाने गाठले होते. अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे नेते लोकांत मिसळत होते. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. सारे नेते असे वैयक्तिक उपचार घेत असताना शरद पवार हे वेगळे ठरत होते. याचे अनेकांना कौतुक वाटत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com