'बारा' हत्तींचं बळ मिळो..! रोहित पवारांनी राज्यपालांना 'पॉलिटिकल' शुभेच्छा देत डिवचलं

विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीची फाईल राज्यपालांकडे अनेक महिन्यांपासून आहे.
'बारा' हत्तींचं बळ मिळो..! रोहित पवारांनी राज्यपालांना 'पॉलिटिकल' शुभेच्छा देत डिवचलं
Governor Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, MLA Rohit Pawar Latest NewsSarkarnama

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh koshyari) आणि महाविकास आघाडी सरकारमधील वाद अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मग तो बारा आमदारांच्या नियुक्ती मुद्दा असो की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. अनेकदा कोश्यारी विरूध्द आघाडी सरकार अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर कधी टीका केली जाते तर कधी घटनात्मक पदाची आठवण करून देण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी राज्यपालांना वाढदिवसाच्या हटके 'पॉलिटिकल' शुभेच्छा दिल्या आहे. (NCP MLA Rohit Pawar Latest Marathi News)

मागील अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती रखडली आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे धुळखात पडून आहे. त्यावरून आघाडी आणि राज्यपाल अनेकदा आमनेसामने आले आहेत. हे प्रकरण न्यायालयातही गेलं होतं. पण न्यायालयाने त्यावर राज्यपालांना कोणताही थेट आदेश दिला नव्हता. त्यामुळं राज्यपालांकडून अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

Governor Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, MLA Rohit Pawar Latest News
उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला; अमित शहांनी घेतली आंदोलनाची दखल

यापार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्यपालांना वाढदिवसाचे निमित्त साधून बारा आमदारांच्या नियुक्तीची आठवण करून दिली. त्यांनी ट्विटरवरून राज्यपालांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय भगतसिंग कोशारी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,' असं पवार यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी राज्यपालांना बारा आमदारांची आठवण करून दिली. 'घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास 'बारा' हत्तीचं बळ मिळो आणि आपणांस दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा,' असं या ट्विटमध्ये लिहिलं आहे. हे ट्विट करून रोहित पवार यांनी राज्यपालांना डिवचल्याची चर्चा आहे.

Governor Bhagat Singh Koshyari Latest Marathi News, MLA Rohit Pawar Latest News
दोन्ही काँग्रेसकडूनचं शिवसेनेचा गेम? फोडाफोडीच्या भीतीनं मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा टेन्शनमध्ये

रोहित पवारांच्या ट्विटमागे हाही संदर्भ?

दरम्यान, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी राज्यपालांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार स्वीकारण्यास नुकताच नकार दिला होता. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राजेंद्र पवार यांनी सांगितले होते की, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे मोघलांचे प्रचंड आक्रमण असतानासुद्धा शेतकऱ्यांकडे बरीक लक्ष होतं. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका. उभ्या पिकामध्ये घोडी घालू नका. तुम्हाला स्वराज्यासाठी दोन कांड्या हव्या असतील, तर त्यासुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना राजी करून घ्या. इतका बारीक विचार करणारा आमचा राजा होता. असं असतानासुद्धा या महाराष्ट्राचा आणि राजाचा इतिहास न समजून घेता वादग्रस्त विधाने करून शांततेचा भंग करणाऱ्या व्यक्तीकडून पुरस्कार घेणे, मला योग्य वाटत नाही.

सर्वसामान्यांसाठी ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली. तसेच, १८७० च्या दरम्यान, शेतकऱ्यांचा आसूड लिहिला. त्यात शेतकऱ्यांनी कसे राहिले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे. पाणी उपलब्धतेसाठी काय केले पाहिजे. याबाबत विस्तृत मार्गदर्शन महात्मा फुले यांनी केले आहे. (राज्यपालांनी सवित्रीबाई फुले विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात फुले दांपत्याबाबत वाद्‌ग्रस्त विधान केले होते.) महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत कारण नसताना वादग्रस्त विधान करणारे आणि आपल्या अस्मितांवर जे घाला घालतात, अशा महान व्यक्तीच्या (राज्यपाल भगतसिंह कोश्यारी) हस्ते हा पुरस्कार घेण्यापेक्षा ज्या कृषी विभागाने हा पुरस्कार मला दिला आहे. त्यांच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार घेणे मला अभिमानाचे वाटेल, असेही राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in