Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी घेतली शपथ; म्हणाले,''बायकोला सोडून कुणालाच...''

Jitendra Awhad Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे व्हॉईसरॉय आहेत...
Jitendra Awhad |
Jitendra Awhad |Sarkarnama

Jitendra Awhad Vs Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत असतात. आता पुन्हा एकदा आव्हांनी शिंदेवर निशाणा साधला आहे. व्हाईसरॉयच्या हातात कायदा होता, त्यामुळे तो कोणाचंही ऐकायचा नाही. मुख्यमंत्री शिंदेंचंदेखील आपल्या हातात कायदा आणि सुव्यवस्था आहे. त्यामुळं आम्ही सांगू तो कायदा, आणि पोलिसांनी तो मानला पाहिजे असं सुरु आहे. त्यामुळे शिंदे हे महाराष्ट्राचे व्हॉईसरॉय आहेत अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे.

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याहस्ते नेरुळमध्ये आगरी कोळी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. आव्हाड म्हणाले, ठाण्यात विरोधकांना टिपून टिपून मारत आहेत. मुख्यमंत्र्यांना वाटतंय, आख्खं ठाणे माझ्या हातात असावं. पण एवढं वर्ष राजकारण केलं तरी पवारसाहेबांनी बारामतीत असं केलं नाही असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

Jitendra Awhad |
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथांचा मुंबई दौरा राष्ट्रवादीच्या निशाण्यावर ; "मुंबई मराठी माणसाचीच.."

मी आता शपथच घेतलीय; बायकोला सोडून...

कुणाच्या अंगावर पूर्वी जायची भीती वाटायची नाही. पण हल्ली अंगावर जायलाही भीती वाटते. कारण कधी रात्री उचलून नेतील सांगता येत नाही. गुन्हा काय? तोही सांगता येत नाही. माझ्या आयुष्यात 72 तासांत दोन गुन्हे झाले. कधी काय होईल सांगता येत नाही. एका बाईला हातानं बाजूला केलं तर तिने माझ्यावर विनयभंगाचाच गुन्हा दाखल केला. गर्दीत बाई दिसली की, मी चार फूट लांब पळतो. याचमुळे बायकोला सोडून कुणालाच स्पर्श करायचा नाही, अशी मी आता शपथच घेतलीय असंही आव्हाड यांनी यावेळी सांगितलं

Jitendra Awhad |
Antigen Scam News: पुणे महापालिकेत आता पोलिसांची एन्ट्री;अँटिजेन खरेदी घोटाळ्याची चौकशी होणार

त्या 1 हजार 500 कोटींचं काय झालं?

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावत नाही. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी यापूर्वी करण्यात आलेले तीनची प्रभागरचना चारची करा अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. पण आधीच्या प्रभागरचनेसाठी खर्च केलेलं 1 हजार 500 कोटींचं काय झालं? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com