मोठी बातमी : Jitendra Awhad राजीनामा देणार ; टि्वटमुळे खळबळ

Jitendra Awhad : लोकशाहीची हत्या ..उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही ," असे टि्वट आव्हाड यांनी केले आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. आव्हाडांच्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. (ncp mla Jitendra Awhad resign latest news)

पोलीसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आहे, तेही कलम 354चे. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा आव्हाड यांनी केली आहे.

Jitendra Awhad
Jitendra Awhad resign : आव्हाडांवर विनयभंगाच्या गुन्हा दाखल ; राष्ट्रवादीकडून जाळपोळ

"पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या ..उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत," असे टि्वट आव्हाड यांनी केले आहे.

Jitendra Awhad
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या शेगावमधील सभेला पवार, ठाकरे उपस्थित राहणार..

'काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो'

कार्यक्रमांच्या निमित्ताने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आव्हाड एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

कळवा पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर ते मुंब्रा येथील वाय जंक्शन येथे रवाना झाले. शिंदेंचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित एका महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि ती महिला आमने-सामने आले.

आव्हाडांनी त्यांना बाजूला करुन पुढे केले. यावेळी आव्हाडांनी आपला विनयभंग केला असल्याचे त्या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

"आव्हाडांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून 'काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो' असे म्हणत ढकलले, असा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात त्या महिलेने आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com