Anil Patil News, Devendra Fadnavis News, Anil Patil on Devendra Fadnavis News
Anil Patil News, Devendra Fadnavis News, Anil Patil on Devendra Fadnavis NewsSarkarnama

गुलाबराव देवकरांचं नाव घेताच फडणवीसांवर अनिल पाटलांचा विधानसभेतच पलटवार

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यावर मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेतही उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांच्या नावाचा उल्लेख करून दरेकरांवरील गुन्हा चुकीचा असल्याचा दावा केला. (Anil Patil News updates)

दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर फडणवीस हे आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील कुठलीही मजूर संस्था काढा, अर्धे आमदार आहेत. सगळ्या पक्षाचे आमदार मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. सुडाच्या भावनेने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आम्ही घाबरणार नाही. न्यायालयात जावू. विरोधी पक्षनेत्यावर अशाप्रकराची कारवाई, आधी असं कधीच घडलं नव्हतं. आमचा आवाज बुलंद राहील, असं फडणवीस म्हणाले.

Anil Patil News, Devendra Fadnavis News, Anil Patil on Devendra Fadnavis News
पांडे हे त्यांच्या मास्टर्स प्लॅननुसार खेळत आहेत!

आजपासून आम्ही सरकारला प्रत्येक ठिकाणचे मजूर संस्थांचे अध्यक्ष कोण आहेत. त्याची यादी देऊ, असं सांगत फडणवीसांनी पहिलं नाव गुलाबराव देवकर यांचं घेतलं. देवकर हे आजही जळगावमध्ये मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत, असं फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. त्यानंतर गोंधळ सुरू झाल्याने पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. कामकजा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी फडणवीसांनी केलेला दावा खोडून काढला.

जळगावचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांचे नाव विरोधी पक्षनेत्यांनी घेतलं. याचा मला खेद वाटतो. प्रविण दरेकर यांच्यावर सरकारने दाखल केलेला गुन्हा योग्यच आहे. कारण ते प्रत्यक्ष मजूर संस्थेचे मजूर सदस्य आहेत. देवकर हे कुठल्याही मजूर संस्थेचे सभासद नाहीत. पण दरेकर हे सभासद आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. ते असे मजूर आहेत ज्यांच्याकडे दोन-दोन कोटी रुपयांची गाडी आहे. पन्नास कोटी कोटींच्या बंगल्यात राहणारे मजूर आहेत. त्यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केलेला गुन्हा योग्य आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केलेला उल्लेख खोटा आहे, असा पलटवार पाटील यांनी केला.

Anil Patil News, Devendra Fadnavis News, Anil Patil on Devendra Fadnavis News
चीननं पुन्हा जगाला हादरवलं; दैनंदिन रुग्णसंख्येने गाठला उच्चांक

दरम्यान, प्रविण देरकर यांच्यावर मुंबै बँक निवडणुकीतील फसवणुकीप्रकरणी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबै बँकेसाठी प्रवीण दरेकर यापूर्वी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच निवडून आले होते. यावेळी देखील त्यांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरला होता. मात्र यंदा त्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रविण दरेकर यांना या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीसही बजावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in