विधिमंडळ गाजवणाऱ्या अमोल मिटकरींना गावातील विरोधकांनी दाखवलं अस्मान

Amol Mitkari : सोसायटीच्या सर्व 13 जागांवर मिटकरींच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे.
Amol Mitkari
Amol Mitkari sarkarnama

अकोट : पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की करणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) कालपासून (बुधवार) खूपच चर्चेत आहे. मात्र त्यांना त्यांच्या गावात मोठा झटका बसला आहे. गावाच्या सोसायटी निवडणुकीत त्यांचा पॅनलचा पुर्ण धुव्वा उडाला आहे. (Amol Mitkari news update)

काँग्रेस-भाजपच्या संयुक्त पॅनलच्या विजयानं आमदार मिटकरींना अस्मान दाखवलं आहे. जिल्हा परिषदेनंतर आमदार मिटकरींना सोसायटीत सलग दुसऱ्यांदा पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. काल झालेल्या या निवडणुकीत 763 पैकी 597 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. याआधी मिटकरींच्या उमेदवाराचा कुटासा जिल्हा परिषद गटात प्रहारच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता.

Amol Mitkari
राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांचे निधन

कुटासा (ता. अकोट) हे मिटकरींचे गाव आहे. या त्यांच्या गावाच्या सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. सोसायटीच्या सर्व 13 जागांवर मिटकरींच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे.

प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके आणि भाजपानेते विजयसिंह सोळंके यांच्या नेतृत्वाखालील 'कास्तकार पॅनल'नं सोसायटीवर झेंडा फडकवला आहे.

या निवडणुकीत एकूण 763 मतदार होते. यातील एकूण 597 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

कास्तकार पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. अमोल मिटकरींच्या 'ग्रामस्वराज पॅनल'चा या निवडणुकीत पुर्ण धुव्वा उडाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com