'भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय'!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची सदाभाऊ खोत यांच्यावर टीका
'भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय'!
Sadabhau Khotsarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आता अकरा उमेदवार रिंगणात आहेत. सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. त्यांनी भाजप (BJP) पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी माघार घेतली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सदाभाऊंना टोला लगावला आहे.

Sadabhau Khot
विखेंची गुगली : राधाकृष्ण यांचे थेट अजितदादांना निमंत्रण तर सुजय म्हणतात शिवसेना चांगली...

या संदर्भात अमोल मिटकरी यांनी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये मिटकरी म्हणाले, सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय. मात्र, आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, "म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल." अशा शब्दांत मिटकरी यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीतही राज्यसभेप्रमाणेच 'बिग फाईट' होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) आणि काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. आकड्यांचे गणित पाहिले तर काँग्रेससाठी ही लढत वरवर सोपी वाटत असली तरी भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत केलेला चमत्कार आघाडीची डोकेदुखी वाढवू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

Sadabhau Khot
पंकजा मुंडे नाराज आहेत का? : फडणवीस म्हणाले आम्ही संपर्कात आहोत...

सदाभाऊ खोत यांनी माघार घेतल्याने आता भाजपला पाचवी जागा जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. तर काँग्रेसलाही दुसरी जागा जिंकण्यासाठी दहा मतांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. भाजपकडून आता प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे उमेदवार आहेत. त्यामध्ये लाड हे पाचवे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे मैदानात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in