राष्ट्रवादीचं ठरलं; विधान परिषदेसाठी रामराजे निंबाळकर अन् खडसेंना संधी?

शरद पवारांची आज सकाळी रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसेंनी घेतली भेट
Eknath Khadse and Ramraje Nimbalkar
Eknath Khadse and Ramraje Nimbalkar Sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीमुळं राजकीय घडामोडींना वेग आला असताना आता विधान परिषदेच्या उमेवारांची नावे समोर येऊ लागली आहे. शिवसेनेकडून दोन नावावंर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही (NCP) दोन नावे अंतिम झाल्याचे समजते. रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादीकडून निंबाळकर आणि खडसेंना उमेदवारी मिळणार आहे. रामराजे निंबाळकर विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यामुळं पुन्हा त्यांना संधी मिळेल, अशी चिन्हे आहेत. याचवेळी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही उमेदवारी मिळेल. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी राज्यपालनियुक्त सदस्यांसाठी 12 नावे पाठवली होती. त्यातही खडसेंचा समावेश होता. पण राज्यपालांनी अद्याप यावर निर्णय न घेतल्यानं खडसेंची आमदारकीही रखडली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळी रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी यांनी भेट घेतली आहे. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. याचबरोबर ते विधान परिषदेचे सभापती असल्यानं त्यांना पुन्हा संधी मिळत आहे. याचवेळी खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करूनही त्यांना अद्याप आमदारकी मिळाली नव्हती. त्यामुळं त्यांच्याही नावाचा विचार राष्ट्रवादीनं विधान परिषदेसाठी केल्याचा समजते, असेही सूत्रांनी सांगितलं.

Eknath Khadse and Ramraje Nimbalkar
कट्टर समर्थकानं मनसे सोडली पण वसंत मोरे देणार राज ठाकरेंना वाढदिवशी मोठं गिफ्ट!

दरम्यान, शिवसेनेकडून (Shivsena) विधानपरिषदेसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Elelction) आहे. एकूण १० आमदार निवडून देण्यासाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. त्या दृष्टीने शिवसेनेने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

Eknath Khadse and Ramraje Nimbalkar
भाजपनं हकालपट्टी केल्यानंतर लगेचच महिला नेत्याला मिळाली पोलिसांची सुरक्षा

ऐन विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर 5 जुलै 2019 रोजी राष्ट्रवादीला धक्का देत सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांचा दबदबा आहे. सचिन अहिर 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. सचिन अहिर यांचे मामा अरुण गवळी यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडून आणलं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात 2009 मध्ये सचिन अहिर गृहनिर्माण राज्यमंत्रिपद मिळालं होतं. शिवसेनेने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिलेले दुसरे उमेदवार आहेत आमशा पाडवी. आमशा पाडवी यांना कट्टर शिवसैनिक म्हणूनही ओळखले जाते. 2019 मध्ये धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघातून पाडवी यांनी विधानसभा निवडणूक लढवली. पण काँग्रेस नेते के.सी पाडवी यांच्याकडून पराभव झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com