मुंबईत दंगली घडाव्यात हा भाजपचा उद्देश होता का ? राष्ट्रवादीचा सवाल

शरद पवारांनी जर एखादं वाक्य बोलून दंगली रोखल्या असतील तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय ?
mahesh tapase,Devendra Fadnavis
mahesh tapase,Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : कलम 370, हिंदू दहशतवाद, इशरत जहाँ, काश्मीर फाईल्स, मुंबई बॉम्बस्फोट आदी मुद्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (ncp)अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल (गुरुवार) टीका केली.

यासंदर्भातली उदाहरणं देत फडणवीस यांनी पवारांविरोधात १४ टि्वट केली आहेत. या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली. गेल्या मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यानंतर फडणवीस यांनीही शरद पवारांवर टीका केली आहे.

फडणवीसांच्या या टि्वटला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (mahesh tapase) यांनी उत्तर दिले आहे. ''राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेब जातीवादी आहेत, असा फडणवीस यांचा एकंदरीत सूर होता. मात्र महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ पाहता आता पक्षाला जातीवादी घोषित करणे एवढंच भाजपकडून बाकी होतं आणि त्याची सुरुवात भाजपचा नवीन फ्रंटमॅन राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केली आहे,'' असे महेश तपासे म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

''पवारसाहेबांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील, दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय ? ९३च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का ? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे,'' असे आव्हान तपासे यांनी केले.

mahesh tapase,Devendra Fadnavis
नाना पटोले अडचणीत, भाजप खासदाराचा गैाप्यस्फोट ; CBIचैाकशी होणार

महेश तपासे म्हणाले, ''गेल्या ५०-५५ वर्षात शरद पवार यांनी समाजातल्या मागासलेल्या, अशिक्षित, दुर्बल अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं सकारात्मक काम केलेले आहे. हे करत असताना जात आणि धर्म हे कधीच पाहिले नाही,''

''घटना समितीचे प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील आरक्षणा संदर्भामध्ये समासंधी आणि मागासलेल्या समाजाच्या मागण्या या दोन गोष्टी सांगितल्या होत्या. कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांच्या अवतीभवती एक राष्ट्रीय व्यापक पॉलिटिकल अजेंडा २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपकडून निर्माण करण्यात येत होता. महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान पवारसाहेबांनी ३७० पेक्षा शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी हे महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचे आहे, असे विधान केले होते. त्या गोष्टीचा विपर्यास करून फडणवीस यांनी ट्विट केले आहे,'' असे तपासे यांनी सांगितले.

mahesh tapase,Devendra Fadnavis
राजसाहेबांनी लोकांच्या समस्या सोडवायच्या अन् तुम्ही काय फक्त टेंडर मधलं कमिशन खाणार?

''जस्टीस राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेत मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाकरीता एक उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आणि त्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा असे जर पवारसाहेबांनी म्हटले तर त्यात गैर काय?'' असा सवालही तपासे यांनी उपस्थित केला आहे.

महेश तपासे म्हणतात..

  • मंडल आयोगाची स्थापना जनता पार्टीचे तत्कालीन देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केली होती हे देवेंद्र फडणवीस विसरले का? त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शरद पवार यांनीच केली. त्यामुळे फडणवीस यांना मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात पण हरकत आहे का?

  • १९९३ ला मुंबईमध्ये बारा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. पवार यांनी तातडीने दूरदर्शनवरून मुंबईत तेरा स्फोट झाले असून तेरावा स्फोट हा मस्जिद बंदर या मुस्लिम बहुल वस्तीत झाला अशी घोषणा केली होती.

  • पवारांच्या या घोषणेमुळे मुंबईमध्ये धार्मिक हिंदू-मुस्लीम क्लेश टळला आणि शेकडो लोकांचे प्राण वाचले. श्रीकृष्ण आयोगाने देखील पवारसाहेबांच्या या चतुराईचे समर्थन केलं आणि मुंबई दोनच दिवसांमध्ये पूर्व परिस्थितीप्रमाणे नॉर्मल झाली.

  • मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून काश्मिरी नागरिकांच्या पुनर्स्थापनेसाठी काश्मीर खोऱ्यामध्ये काय प्रयत्न केले हेही देवेंद्र फडणविसांनी आम्हाला सांगावे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com