राज ठाकरेंच्या ताफ्यात गुजरातची गाडी? गाडीत कोण होतं?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे.
Raj Thackeray in Pune
Raj Thackeray in PuneSarkarnama

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे शुक्रवारी मुंबईतून पुण्यात दाखल झाले. यावेळी त्यांच्या ताफ्यातील एक गाडी गुजरातमधील असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्याने केला आहे. ठाकरेंच्या ताफ्यात गुजरातची (Gujarat) गाडी कशी, असा अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

राज ठाकरे हे एक मे रोजी पुण्यातून औरंगाबादकडे रवाना होणार आहे. या सभेची जोरदार तयारी मनसेकडून केली जात आहे. त्यासाठी राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले. यावेळी त्यांच्या ताफ्यात अनेक गाड्या होत्या. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पण ठाकरेंच्या ताफ्यात एक गुजरातची गाडी होती, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रविकांत वरपे (Ravikant Warpe) यांनी केला आहे.

Raj Thackeray in Pune
केंद्र म्हणतेय, कोळशाची टंचाई नाही अन् दुसरीकडे रेल्वेच्या 670 फेऱ्या रद्द करण्याची वेळ

वरपे यांनी या गाडीचा एक फोटो ट्विट करून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. 'राज ठाकरेंच्या पुणे ताफ्यात GJ 12 BF 2121 ही गुजरातची गाडी कशी? गाडीत कोण होते? गाडीत काय साहित्य होते? मनसेचा मराठी बाणा गुजरातकडे वळला की काय? औरंगाबादची सभा गुजरातवरून ठरली आहे का, असे अनेक सवाल वरपे यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी मिळाल्यानंतर आता भीम आर्मीने आक्रमक भूमिका घेतली आहे. सभेला परवानगी देताना पोलिसांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन झाल्यास सभा बंद पाडण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. या सभेसाठी पोलिसांनी 16 अटी घातल्या आहेत. जातीय तेढ व धार्मिक भावना भडकावणारे भाषण करू नये, असे पोलिसांनी बजावले आहे. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी करू नये, असेही पोलिसांनी म्हटले आहे. याचबरोबर कोणीही शस्त्रे, तलवारी अथवा स्फोटके जवळ बाळगू नयेत, असेही पोलिसांनी बजावले आहे.

याबाबत बोलताना भीम आर्मीचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक कांबळे म्हणाले की, पोलिसांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन झाल्यास आम्ही सभेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देऊन सभा बंद पाडू. यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. आम्ही सभेत नियमांचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवून असू.

राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे या सभेसाठी सुमारे अडीच हजार हिंदुत्ववादी कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. दरम्यान, परवानगी मिळाली नाही तरी सभा घेण्यावर मनसे ठाम असल्याने पोलिसांनी देखील संघर्ष टाळत संयमाची भूमिका घेतली आहे. मनसे नेत्यांच्या आधी काल स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांची महत्वाची बैठकही पार पडली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com