राणेंनी सरकार पडण्याचा मूहूर्त सांगताच मलिकांनी कोंबड्यांचा विषय काढला..

भाजपचे (BJP) जुने नेते आता थकल्याने आता नवीन खेळाडूंना जबाबदारी दिली आहे. असा टोला नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लगावला आहे.
Nawab Malik & Narayan Rane
Nawab Malik & Narayan Rane Sarkarnama

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाले तेंव्हापासूनच विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने सरकार पडण्याबाबत अनेकदा भविष्यवाणी करण्यात येत आहे. भाजप नेत्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

नवाब मलिक म्हणाले, बोकड, कोंबड्या ठेवून आणि नवसाने सरकार पडत नाही किंवा बनत नाही. सुरुवातीला भविष्यवाणीने सरकार पाडत होते. आता नवसाने पाडण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, या भ्रमात राहू नये, असा खोचक व सबुरीचा सल्ला त्यांनी भाजपला माध्यमांशी बोलतांना दिला आहे.

Nawab Malik & Narayan Rane
मोठी बातमी : राज्यात भाजपचं सरकार कधी येणार? राणेंनी सांगितला मुहूर्त

काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता 'त्या' कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावेच लागतेय, अशा आशयाचे ट्वीट करत नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या मनसुब्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. अशी भविष्यवाणी करुन थकले. शेवटी त्यांची भविष्यवाणी खरी होईना म्हटल्यावर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करू लागले. मात्र, आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे.

Nawab Malik & Narayan Rane
परमबीरसिंह यांना अखेर न्यायालयाचा मोठा दिलासा

२३ वर्षापूर्वी नारायण राणे मुख्यमंत्री होते. त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि आता त्या कोंबड्या व बोकडासाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावे लागतेय असा उपरोधक टोला त्यांनी राणेंना लगावला.

मलिक म्हणाले आमचे आघाडी सरकार खंबीर आहे आणि ते पाच वर्ष पूर्ण करेल. याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांसाठी सरकार बनवले नाही तर, २५ वर्षासाठी टिकेल, असे जाहीर केल्याची आठवणही त्यांनी भाजपला करुन दिली. याबरोबरच भाजपचे जुने नेते आता थकले आहेत. आता नवीन खेळाडूंना जबाबदारी दिली आहे. ते बोलतील परंतु त्याने सरकार जात नाही, असा टोलाही मलिकांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com