NCBला गांजा अन् तंबाखू यांच्यातील फरक समजत नाही ; मलिकांचा खोचक टोला

NCB एवढी मोठी एजन्सी आहे, तिला तंबाखू आणि गांजा मध्ये फरक समजत नाही, असा टोला मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीला लगावला.

NCBला गांजा अन् तंबाखू यांच्यातील फरक समजत नाही ; मलिकांचा खोचक टोला
Nawab Malik Sarkarnama

मुंबई : क्रुझ पार्टी प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या रडारवर एनसीबी (ncb) असून आज त्यांनी एनसीबीच्या 'कारभारावर' अनेक आरोप केले. ''माझ्या जावायाला या प्रकरणात अडकविण्यात आले,'' असा आरोप मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. त्यांनी काही पुरावे माध्यमांच्या प्रतिनिधींना दाखविले.

नवाब मलिक यांना फोनवरुल धमकी आल्याचा धावा करण्यात आल्याने त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक आज कोणत्या गोष्टीवर गैाप्यस्फोट करणार याकडे सगळ्याचे लक्ष होते. नवाब मलिक म्हणाले की, माझा जावाई ड्रग्ज प्रकरणी साडेआठ महिने कारागृहात होता. त्यामुळे आमच्या कुटुबियांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यामुळे माझी मुलगी, तिचे दोन मुले यांच्यावर त्याचा परिणाम झाला. या काळात ती कुटुंबियाशिवाय कुणाच्याही संपर्कात नव्हती.

Nawab Malik
पंकजा मुंडे दोन वर्षात साचलेल्या कोणत्या गोष्टींवर उद्या बोलणार!

कोर्टाचा आदेश आला असून यात 200 किलो गांजा सापडला नाही, तर एका महिलेकडे साडेसात ग्राम गांजा सापडला आहे.बाकीचे हर्बल तंबाखू आहे. मग NCB एवढी मोठी एजन्सी आहे, तिला तंबाखू आणि गांजा मध्ये फरक समजत नाही, असा टोला मलिक यांनी एनसीबीला लगावला. ''ता. 3 जानेवारी माझ्या जावयाला अटक झाली. तेव्हा मी म्हणालो होतो कायद्या अन् न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. पण भाजप नेते सगळ्या चॅनेल वर सांगत होते नवाब मलिक यांचा जावई ड्रग डीलर आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी पण आरोप केले. पण 27 तारखेला NDPS च्या स्पेशल कोर्टाने माझा जावई समीर खान आणि इतर दोन आरोपींना जामीन दिला. कोर्ट ऑर्डर मध्ये माझं नाव घेऊन बातम्या चालल्या. माझ्या जावायाबाबत बातम्या पेरण्यात आल्या. माझी मुलगी तिच्या दोन्ही मुलांवर त्याचा परिणाम झाला. मुलं समाजात बाहेर जायला तयार नव्हती, असे मलिक यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.