केसरकरांना शिवसेनेचा इतिहास माहिती नाही; पवारांनी शिवसैनिकांचा स्वाभिमानच जपला...

Sharad Pawar|Deepak Kesarkar|Shivsena : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकरांना प्रत्युत्तर दिले आहे.
Sharad Pawar, Deepak Kesarkar news, Political News
Sharad Pawar, Deepak Kesarkar news, Political Newssarkarnama

मुंबई : बेकायदेशीर शिंदेसरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचे शरद पवार (Sharad Pawar) साहेबांवरील वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे. पवार यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केसरकर यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला तपासे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. (Sharad Pawar, Deepak Kesarkar Latest Marathi news)

Sharad Pawar, Deepak Kesarkar news, Political News
'मुख्यमंत्रीसाहेब सरपंचाची निवड जनतेतूनच करा'

तपासे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे. तर पवारसाहेबांनी शिवसेना आणि शिवसैनिकांचा स्वाभिमान आणि मैत्री जपण्याचे काम केले आहे. केसरकरांना शिवसेनेचा इतिहास आणि जे लोक बाहेर पडले त्यांची कारणे कदाचित माहीत नसावीत, असा टोला तपासे यांनी केसरकरांना लगावला.

पुढे बोलतांना तपासे म्हणाले, जेव्हा फडणवीस यांनी शिवसेनेला झिडकारले त्यावेळी पवार साहेबांनीच शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली व शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले होते. हे केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत. तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती याची आठवणही तपासेंनी केसरकरांना करुन दिली आहे.

Sharad Pawar, Deepak Kesarkar news, Political News
BMC निवडणुकीचं पवारांनी रणशिंग फुंकलं : युतीचा विचार न करता कामाला लागा...

दरम्यान, पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले होते की, नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत केली. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती, असेही पवारांनी सांगितल्याचा दावा केसरकरांनी केला. तर छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले. तसेच राज ठाकरे यांच्या पाठिशीही पवारांचे आशीर्वादच होते. कारण पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, असे सूचक वक्तव्य केसरकरांनी केले होते. या टीकेवर राष्ट्रवादीकडून केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in