अग्निपथ योजना : उमेदीच्या वयात निवृत्त होऊन तरुण पुढे काय करणार? : राष्ट्रवादीचा सवाल

Agneepath Scheme | Mahesh Tapase| NCP | ‘मिशन अग्निपथ’ योजनेच्या घोषणेनंतर देशभरातील तरुणांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
अग्निपथ योजना : उमेदीच्या वयात निवृत्त होऊन तरुण पुढे काय करणार? : राष्ट्रवादीचा सवाल
Mahesh Tapase| NCP |

मुंबई : 'अग्निपथ' ही चार वर्षांसाठी भारतीय सैन्यातील भरती म्हणजे आयुष्यभराची बेरोजगारी असून ही योजना आणून मोदी सरकारने (Modi Government) देशातील बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे, असा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी हल्लाबोल केला आहे. (Mahesh tapase criticized Agneepath Scheme)

सैन्य भरतीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेच्या घोषणेनंतर सलग तिसऱ्या तिसऱ्या दिवशी बिहारसह हरयाणा, राजस्थानसह अन्य काही राज्यांमध्ये तरुणांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही योजना रद्द करण्याची मागणी भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांकडून केली जात असून त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.

Mahesh Tapase| NCP |
सैन्य भरतीवरून आगडोंब; इंटरसिटीनंतर जम्मू-तावी एक्सप्रेस अन् पॅसेंजरला लावली आग

या योजनेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकीकडे 'वन रँक वन पेंशन' अशी योजना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरीकडे बेरोजगार तरुणांसाठी 'अग्निपथ' अशी योजना आणून त्यात 'नो रँक नो पेंशन नो ग्रॅज्युईटी' आणतात. त्यामुळे ही योजनाच बंद करून केंद्र सरकारने तरुणांसाठी कायमस्वरूपी योजना आणावी, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

आयुष्यभराची बेरोजगारी अशी 'अग्निपथ' ही योजना असून या योजनेला देशभरातून तरुण पिढी विरोध करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही या योजनेला विरोध असल्याचे महेश तपासे यांनी म्हटलं आहे. प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देण्यात मोदीसरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरले आहे. आम्ही फक्त रोजगार दिला हे भासवण्यासाठी 'अग्निपथ' ही पोकळ योजना आणल्याचा आरोप करतानाच साडेसतरा ते २३ वर्ष हे तरुणांचे उमेदीचे वर्ष असून २४ किंवा २५ व्या वर्षी निवृत्त होऊन या तरुणांनी पुढे काय करायचे? असा संतप्त सवालही महेश तपासे यांनी केंद्रसरकारला केला आहे.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच नवी दिल्लीत या योजनेची घोषणा केली. ‘अग्निपथ’ योजनेत दर वर्षी साधारणतः ५० हजार याप्रमाणे प्रत्येकी ४ वर्षांसाठी तरुणांची सैन्यभरती करण्यात येणार आहे. ४ वर्षांनी त्यातील २५ टक्के तरुणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाणार आहे, तर उर्वरित अग्निवीरांना निवृत्तिवेतन मिळणार आहे. त्यावरूनच तरुणांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ही योजना रद्द करण्याची मागणी तरूणांकडून केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in