मावळमध्ये नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता!

अमानवी कृत्याचे दु:ख होणे हे माणुसकीचे लक्षण आहे.
मावळमध्ये नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता!
jitendra awhadsarkarnama

ठाणे : मावळमध्ये गोळीबार झाला त्यावेळी जालियनवाला बाग आठवले नाही का?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारला केला होता. यावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पलटवार केला. मावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. चौकशीत न्यायाधीशांनी मान्य केले आहे की या गोळीबाराची गरज होती. त्या ठिकाणी कोणत्या नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता, अशा शब्दात आव्हाड यांनी पलटवार केला आहे. (NCP leader Jitendra Awhad criticizes BJP)

आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, मावळची दुर्घटना घडली त्याची चौकशी तेव्हा केली. त्यावेळी गोळीबार कसा गरजेचा होता हे न्यायाधीशांनी मान्य केले आहे. तुम्ही विरोधी पक्षात होता ना तेव्हा. त्यामुळे मावळचे उदाहरण आणि हे उदाहरण देऊ नका. मावळमध्ये पोलिसांच्या हातातून बंदुका घेऊन कोणत्या नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता. इथे देशाच्या गृहराज्यमंत्र्याचा पोरगा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून गाडी घेऊन जातो. पोलिस आणि सामान्य जनतेत काही फरक आहे की नाही? असे आव्हाड म्हणाले.

jitendra awhad
आता फक्त मोदींच्या खुर्चीचा लिलाव बाकी आहे!

अमानवी कृत्याचे दु:ख होणे हे माणुसकीचे लक्षण आहे. सत्तेची मग्रुरी व सत्तेचा माज त्या घटनेतून दिसून येतो. शेतकरी रस्त्यावर उभे आहेत. पाठिमागून जीप आणून अंगावर घालायची आणि आठ जणांना चिरडून मारायचे यांच्याबद्दल वाईट वाटणारच. शेतकरी देशासाठी अन्न पिकवतो ना? उत्तर प्रदेशातील ज्या भागात ही घटना घडली. त्या भागात सर्वाधिक गहू पिकतो. तुमच्या घरातील पोळ्या या तिथूनच आलेल्या गव्हाच्या बनतात. खाताना बर वाटत ना? तुमच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच या सर्वातून दिसून येते, अशी टीका आव्हाड यांनी केली.

jitendra awhad
राज्यातील रस्त्यांसाठी ठाकरे अन् गडकरींच्या बैठकीत ठरला प्लॅन!

फडणवीस हे विरोधी पक्षात आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी बंद केला त्यामुळे ते बोलणारच. त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे. शेवटी ते विरोधक आहेत. मात्र, जे चिरडून मारले गेले त्यांच्याबद्दल संवेदना दाखवल्या असत्या तर त्यांच्यातली माणुसकी दिसली असती. प्रत्यके गोष्टीत राजकारण करावे असे काही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मला चित्रपटाचा एक संवाद आटवतो. क्या गरीब की जान, जान नही होती सेठ…श्रीमंताना काही झाले की आम्हाला वाईट वाटणार अन् गरीबांबाबत काहीच नाही. बंदबाबत विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या. मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत देशातील जनतेला चिंता आहे. हा महात्मा गांधींचा देश आहे.

Related Stories

No stories found.