जयंत पाटील म्हणतात, टेक केअर..गेट वेल सून..!

मुंबईच्या आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आलेले परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या विरोधात लेटरबॉम्ब टाकला आहे.
ncp leader jayant patil wishes for speedy recovery of aaditya thackeray
ncp leader jayant patil wishes for speedy recovery of aaditya thackeray

मुंबई : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत ठाकरे यांनी ट्‌विटद्वारे माहिती दिली असून, संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरव आदित्य ठाकरेंना  'गेट वेल सून' असे म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आयपीएस अधिकारी परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांवर मात्र, त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. 

राज्यातील अनेक मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री एकनाथ खडसे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा समावेश आहे. आता आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नागरिकांना मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे ही त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर केले. 

आदित्य ठाकरेंचे ट्विट जयंत पाटील यांनी रिट्विट केले आहे. टेक केअर आदित्य ठाकरे. गेट वेल सून. तुम्ही लवकर बरे व्हावे, अशी सदिच्छा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, अनिल देशमुखांवर परमबीरसिंगांनी केलेल्या आरोपांवर पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, पाटील यांच्या ट्विटवर एका नेटिझनने सर गृहमंत्रिपद स्वीकारण्यास तयार राहा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या ट्विटची चर्चा सुरू झाली आहे. 

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीरसिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आता परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पत्र लिहिले असून, यात गृहमंत्र्यावरच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com