पंतप्रधान कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना कथित पत्रकाराने अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरलं!

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे.
ncp leader jayant patil slams bjp over arnab goswami whatsapp chat contoversy
ncp leader jayant patil slams bjp over arnab goswami whatsapp chat contoversy

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. बालाकोटमधील हल्ल्यासह अतिशय महत्वाची माहिती गोस्वामींना आधीपासूनच असल्याचे यातून समोर आले आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहेत. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला आहे. 

गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुन मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, भाजप नेत्यांनी या प्रकऱणी मौन धारण केले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मुद्द्यावरुन भाजला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

पाटील म्हणाले की, प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात येते. मात्र, प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते. या व्यक्तीला या देशातील सैनिकांचे झालेले बलिदान हा एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर या देशातील खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल. 

हा व्यक्ती अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या देखील गप्पा मारत असल्याचे अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे. न्यायालयाचा हा खऱ्या अर्थाने अवमान आहे. अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रिमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला माहिती होत्या. महाविकास आघाडी सरकारने या टीआरपी घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते, असे पाटील यांनी नमूद केले आहे.

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com