राज्याला अपंग करुन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीतच व्यस्त

Eknath Shinde|NCP|BJP|Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
Eknath Shinde, Jayant Patil Latest News
Eknath Shinde, Jayant Patil Latest News sarkarnama

मुंबई : गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत आणि दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Eknath Shinde, Jayant Patil Latest News)

Eknath Shinde, Jayant Patil Latest News
अर्जुन खोतकरांच्या चेहऱ्यावर शंभर कोटींचे टेन्शन! जाणून घ्या प्रकरण..

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार का करत नाही, असा प्रश्न विचारला यावर बोलतांना पाटील म्हणाले की, ज्याअर्थी ते मंत्रीमंडळाचा विस्तार करत नाही त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जे लोकं जीवाभावाची शिवसेना सोडून गेले आहेत त्यामुळे तिथे ते फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असं वाटत नाही. त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता आहे. असे पाटील म्हणाले.

या राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न आज सुटण्याऐवजी वाढायला लागले आहेत. राज्यात पुरपरिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्या भागात पालकमंत्री नाही. फक्त दोन मंत्री महाराष्ट्राला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने आहेत. मात्र, त्यांच्यातील गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त काळ जात आहे, अशी टीकाही पाटीलांनी केली.

Eknath Shinde, Jayant Patil Latest News
पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा गोंधळ : निलंबित खासदारांची संख्या २३ च्या घरात...

राज्यात पुरपरिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री तिथे ठाण मांडून बसले असते आणि फार मोठी मदत लोकांना झाली असती. महाराष्ट्रात मंत्री नसल्याने जिल्हया- जिल्हयात दयनीय अवस्था झाली आहे आणि हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे, अश्या शब्दात पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना सुनावले आहे.

दरम्यान, राज्यात नवं सरकार स्थापन होऊन सुमारे महिना होत आला तरी मंत्रीमंडळ विस्तार झाला नसल्याने विरोधी पक्षाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. याबाबतच विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह इतर विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच अतिवृष्टी व पूरामुळे झालेलं शेतजमिन आणि पिकांचं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचं अधिवेशन तातडीने बोलवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रामार्फत केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in