Jayant Patil : मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील ? ; पवारांचे स्वप्न खरं ठरेल का ?

Jayant Patil Today birthday News : अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे ही प्रमुख नावे मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत चर्चेत असतात.
Jayant Patil Today birthday News
Jayant Patil Today birthday News Sarkarnama

Jayant Patil Today birthday News : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा आज वाढदिवस.त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेपियन्सी रोडवर एका कार्येकर्त्याने बॅनर लावले आहेत. याची चर्चा सध्या सोशल मीडियासह राज्यभर होत आहे.

एखाद्या नेत्याचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येते,पण ही नुसतीच चर्चा ठरते. तर काही वेळेला ध्यानीमनी नसतानाही मुख्यमंत्र्यांची माळ गळ्यात पडते, बाळासाहेब विखे पाटील, पतंगराव कदम, रामराव आदीक,सुधीर जोशी यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी नेहमीच चर्चेत होती, पण ती केवळ चर्चा ठरली.तर बाबासाहेब भोसले, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांची नावे फारसे चर्चेत नसतानाही ते मुख्यमंत्री झाले.

ncp latest news
ncp latest news sarkarnama

काही दिवसापूर्वी 'राष्ट्रवादी काँग्रेस नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा," असे विधान आमदार निलेश लंके यांनी केल्याने अजितदादांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव सध्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. अशी बॅनरबाजी सध्या पाहायला मिळत आहे. त्यांच्या समर्थकाने लावलेल्या बॅनरवर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे, त्यामुळे या चर्चांना पु्न्हा हवा मिळाली आहे.

जर-तरच्या राजकारणाचा विचार केला तर महाविकास आघाडीची सत्ता आली तर राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचे नाव आघाडीवर असेल, ते जाणून घेऊया. राष्ट्रवादीत अजित पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे ही प्रमुख नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असतात.

पक्षाकडून अजित पवार यांचे नाव पुढे आले तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ते टाळू शकणार नाही, पण ज्यावेळी अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत येते, तेव्हा माध्यमांशी बोलताना शरद पवार नेहमी या विषयावर बोलण्याचं टाळतात, "आज आमच्याकडे संख्याबळ नसल्याने यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही," असे शरद पवारांनी यापूर्वी सांगितले आहे.

Jayant Patil Today birthday News
Supriya Sule : सुप्रियाताई, सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले ? ; भाजपकडून सडेतोड उत्तर

अजित पवार यांचे गटातटाचे राजकारण, नेतृत्व यामुळे त्यांचे नाव पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी येऊ शकते, पण शिवसेना, काँग्रेससाठी अजित पवार यांचे नाव अडचणीचे ठरु शकते, कारण अजितदादांची इतरांशी जुळूवून घेण्याची क्षमता, त्यांच्यावर असलेला अविश्वासूपणाचा शिक्का या दोन गोष्टी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदापासून लांब ठेवू शकतात.

राष्ट्रवादीकडून दुसरं नाव येते ते म्हणजे सुप्रिया सुळें यांचं. काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची पुढची मुख्यमंत्री महिला असेल, असे विधान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत आलं.

आगामी निवडणुकीत केंद्रात पुन्हा मोदी सरकार आले तर फक्त खासदार म्हणून सुळेंची पाच वर्ष वाटचाल सुरु राहिल. पण 'लॉगटर्म'चा विचार केला तर सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात सक्रिय करण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी सुळे यांचे नाव आलं तर त्याला शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेसचा फारसा विरोध राहणार नाही, असे राजकीय विश्लेषकांना वाटतं.

Jayant Patil Today birthday News
Sadabhau Khot : पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचाच डाव ; फडणवीसांनंतर आणखी एका नेत्याचा आरोप

मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून तिसरं नाव येते ते म्हणजे अर्थात जयंत पाटील यांचे, त्यांच्या समर्थकांना साहेब मुख्यमंत्री होतील, अशी आशा आहे, असे फलक अधून मधून लावण्यात येतात, २०१४ पासून पक्षाचे सक्षम प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील उत्तम काम करीत आहेत.

संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. 'करेक्ट कार्यक्रम' असा हॅशटॅग घेऊन त्यांनी आपलं आक्रमक राजकारण केलं आहे. त्यांच्यामागे किती आमदार आहे, हा अभ्यासाचा विषय असला तरी, शरद पवार यांच्या पाठिंब्याने जयंतरावाचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकते.

गटातटाच्या राजकारणात अजित पवारांना शह द्यायचा असेल आणि सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात उतरावयाचे नसेल तर जयंत पाटील हे नाव पक्षातील सगळ्यांसाठी सोयीचं ठरु शकते म्हणून जयंत पाटलांच्या नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असल्यास आश्चर्य वाटायला नको.

संतोष पवारांचे हे स्वप्न खरे ठरेल का ?

जयंत पाटील यांच्या वाढदिवसामिनित्त मुंबईत त्यांच्या घरासमोर एका तालुका प्रतिनिधीने घराबाहेर बॅनर लावला आहे. ज्यामध्ये जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. नेपियन्सी रोडवर हे बॅनर सध्या झळकत आहेत. #Boss माझं दैवत भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे हे बॅनर आहेत. संतोष पवार असे बॅनर लावणाऱ्याचे नाव आहे. संतोष पवारांचे हे स्वप्न खरे ठरेल का ? हे आघाडीची सत्ता आल्यावरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in