राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांचे निधन

Bapusaheb Gorthekar : बापूसाहेब गोरठेकर यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
Bapusaheb Gorthekar
Bapusaheb Gorthekarsarkarnama

नांदेड : राष्ट्रवादी कॉग्रेसचे (ncp) ज्येष्ठ नेते तथा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर (Bapusaheb Gorthekar)यांचे काल (बुधवारी) निधन झाले. (Ncp leader former MLA Bapusaheb Gorthekar passes away)

त्याचे मागे दोन मुलं आहेत.त्यांच्या निधनाने भोकर विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. काल रात्री नऊ वाजता नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गोरठेकरांची (वय ७८) प्राणज्योत मालवली.

जिल्हा परिषद अध्यक्ष , जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार पद भुषवलेले बापूसाहेब गोरठेकर यांची शब्द पाळणारा, प्रामाणिक नेता म्हणून ओळख होती. विरोधक असलेले बापूसाहेब गोरठेकर यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करत भोकर मतदार संघातून अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत गोरठेकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मागील वर्षी गोरठेकर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. काही दिवसांपासून गोरठेकर आजारी होते. आज (गुरुवारी) दुपारी चार वाजता गोरठा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Bapusaheb Gorthekar
एसी लोकलमुळे विधिमंडळातील वातावरण गरम ; ..नाहीतर मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर आग लागेल ; आव्हाडांचा इशारा

गोरठेकर यांची काल (बुधवारी) प्रकृती बिघडल्याने त्यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यामुळे मतदारसंघात शोककळा पसरली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगलाच प्रभाव होता. आजही त्यांची मतदारसंघात चांगलीच पकड होती.

बापूसाहेब गोरठेकर यांचे वडिल स्व. बाबासाहेब गोरठेकर राष्ट्रवादीशी एकनिष्ठ होते. ते राष्ट्रवादीकडून अनेकदा आमदार झाले होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत बापूसाहेब यांनीही राष्ट्रावादीचा वसा घेतला.

भोकर विधानसभा लढता लढता नायगाव विधानसभा निवडणूक लढवली त्या ठिकाणी मात्र त्यांचा अपक्ष उमेदवाराकडून पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत काम केले, पुन्हा परत आपल्या मूळ पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात घरवापसीची केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com