राष्ट्रवादीची ‘हनुमान’ उडी; थेट मोदींच्या घरासमोर करायचंय चालीसा पठण, नेत्याचं शहांना पत्र

महाराष्ट्रात हनुमान चालीसा पठणावरून राजकारण तापलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं.
Fahmida Hasan Khan, PM Narendra Modi
Fahmida Hasan Khan, PM Narendra ModiSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणावरून राजकारण तापलं आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. पण त्यानंतर राज्यात मागील तीन दिवस झालेल्या राजकीय ड्रामा झाला. पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली असून न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) उडी घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर मुंबई विभागाच्या कार्याध्यक्ष फहमीदा हसन खान (Fahmida Hasan Khan) यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर हनुमान चालीसा, नवकार मंत्र, गुरूग्रंथासह नमाज पठण करण्यासाठी परवानगी मागितली आहे. दिवस आणि वेळ आपण सांगावे, असंही त्यात म्हटलं आहे. त्यामुळे आता यावरूनही राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Fahmida Hasan Khan, PM Narendra Modi
शिवसेनेतील नाराजीनाट्यावर पडदा; चोवीस तासातच 25 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे

फहमीदा खान यांच्या दाव्यानुसार, त्या आपल्या घरात नेहमी हनुमान चालीसा पठण आणि दुर्गा पुजा करतात. पण देशातील वाढती महागाई, बेरोजगारीबाबत पंतप्रधान मोदींना जागे करणे गरजेचे आहे, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण केल्यामुळे रवी राणा आणि नवनीत राणा यांना फायदा दिसत असले तर देशासाठी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर नमाज, हनुमान चालीसा पठण, दुर्गा पुजासह सर्व धर्मांच्या प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे, असंही खान म्हणाल्या.

दरम्यान, रवी राणा व नवनीत राणा यांना अटक करून रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या जामीनावर 29 एप्रिल रोजी निर्णय होणार आहे. त्यामुळे दोघांना तोपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. भाजपकडून राणा दाम्पत्याच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com