Eknath Khadse : ५० खोक्याचं वाटप कुणी केलं ? ; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, चर्चांना उधाण

Eknath Khadse : रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या 'खोक्यात' एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे.
Eknath Khadse, Eknath Shinde
Eknath Khadse, Eknath Shindesarkarnama

Eknath Khadse : आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींवर फैरी झडत आहेत. शिंदे गट-भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. (Eknath Khadse latest news)

राज्यात सत्तातर झाले, त्यानंतर "पन्नास खोके" हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचलित झाला. अधिवेशनाच्या काळात विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात "पन्नास खोके एकदम ओके" घोषणा देऊन सरकारला 'सळो की पळो'करुन सोडलं होतं.

"पन्नास खोके एकदम ओके" या घोषणांनी विधिमंडळ परिसर विरोधकांनी दणाणून सोडला होता. त्यानंतर आता आमदार आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात खोक्यावरुन राजकारण तापलं आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप केला आहे.त्यावर राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ खडसे हे (आज) शनिवारी मेळघाट दौऱ्यावर आहे. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.

Eknath Khadse, Eknath Shinde
Devendra Fadanvis : पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच शिंदे सरकारचा मोठा निर्णय

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या 'खोक्यात' एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे. एकनाथ खडसे यांनी खोक्यांच्या आरोपावरून खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. बच्चू कडू यांनी खोके घेतले की रवी राणा यांनी खोके घेतले याचे उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील, कारण खोके देण्याचा किंवा घेण्याचा व्यवहार एकनाथ शिंदे यांच्या हातातून झाला असल्याचे दिसते," असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केल्ल्या या गंभीर आरोपाला मुख्यमंत्री काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री आज (शनिवारी) नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in