कुणीही नवखे आले की पक्ष उमेदवारी देतो! मुंडेंना डावलल्यामुळे खडसे नाराज

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंना विधान परिषदेचं तिकीट...
Eknath Khadse Latest Marathi News, Vidhan Parishad Election 2022 News, Pankaja Munde News
Eknath Khadse Latest Marathi News, Vidhan Parishad Election 2022 News, Pankaja Munde NewsSarkarnama

मुंबई : विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना संधी दिली आहे. पण पंकजा मुंडे यांना डावलल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे. कोणीही नवखे आले की त्यांच्यासाठी पक्ष उमेदवारी देतो. पंकजा मुंडे यांना तिकीट न देणे खरोखरच दुर्दैवी आहे, असं खडसे म्हणाले आहेत. (Eknath Khadse Latest Marathi News)

खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुंडे आणि महाजन या दोन्ही परिवारांनी आपले आयुष्य भारतीय जनता पार्टी साठी खर्ची घातले. त्यांनी पक्षाला मोठे केले, मात्र त्यांच्या कुटुंबियांना अशी वागणूक दिली जात आहे. विरोधी पक्षनेते फार अनुभवी आहेत आणि कदाचित म्हणून त्यांनी त्यानुसार निर्णय घेतला असेल, असा टोला खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. (Vidhan Parishad Election 2022 News)

Eknath Khadse Latest Marathi News, Vidhan Parishad Election 2022 News, Pankaja Munde News
भाजपसाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; फडणवीस बैठकांना हजर राहणार, मतदानाचा मार्गही मोकळा

पुढचे आयुष्य राष्ट्रवादीसाठी

मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे. आधी भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा माझा प्रवास झाला. माझे राजकीय जीवन अडचणीत असताना राष्ट्रवादी आणि शरद पवार यांनी मला आधार दिला. माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझे अर्धे आयुष्य हे भाजपला मोठे करण्यात गेले आणि आता पुढचे आयुष्य राष्ट्रवादीला मोठे करण्यात जाईल, अशी भावना खडसे यांनी व्यक्त केली.

भाजपवर जोरदार टीका

आधीच्या काळी समन्वयाने आणि सामोपचाराने उमेदवारी देऊन हे प्रश्न निकाली लावले जात होते. मात्र आता जाणून बुजून घोडेबाजाराला प्राधान्य देऊन राजकारण केले जात आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे, असं सांगत खडसे यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली.

Eknath Khadse Latest Marathi News, Vidhan Parishad Election 2022 News, Pankaja Munde News
विराट सभेचा फॉर्म्यूला! नितेश राणेंनी 'तो' फोटो ट्विट करताच खैरे संतापले

खडसेंचं औक्षण

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुबई येथील निवासस्थानी पत्नी मंदा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे औक्षण केले. यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की,कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार,अजितदादा पवार, जयंत पाटील यांनी आपल्याला साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन आपले पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com