Girish Mahajan : नाथाभाऊंनी 'ती' सीडी दाखवावी ; त्यांना पुन्हा क्लिन चीट मिळेल ; गिरीश महाजनांनी डिवचलं

Girish Mahajan : आमच्याकडे काय असेल ते मी दाखवेन. उगाच वल्गना करायच्या नाहीत,"
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama

Girish Mahajan : भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. महाजन शुक्रवारी माध्यमांशी बोलत होते. गिरीश महाजन म्हणाले "नाथा भाऊंकडे (एकनाथ खडसे) काय असेल ते त्यांनी दाखवावे. आमच्याकडे काय असेल ते मी दाखवेन. उगाच वल्गना करायच्या नाहीत,"

भोसरी जमीन गैरव्यवहार कथित प्रकरणात विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आता पुन्हा अडचणीत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. भोसरीतील जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे, असा दावा पुण्यातील बांधकाम व्यवसायिक हेमंत गावडे यांनी केला आहे. या जागेची किंमत तीस कोटीहून अधिक असताना खडसेंनी ती पावने चार कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

खडसेंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. महाजन यांनी खडसेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. खडसे अनेक वर्षापासून सांगतात की मला ईडी लावली तर मी सीडी काढेल," यावर महाजन यांनी भाष्य केले आहे. गिरीश महाजन म्हणाले "नाथा भाऊंकडे (एकनाथ खडसे) काय असेल ते त्यांनी दाखवावे. आमच्याकडे काय असेल ते मी दाखवेन. उगाच वल्गना करायच्या नाहीत,"

"खडसेंबाबत पुणे न्यायालयाचा निकाल पाहिला आहे. याबाब अंजली दमानिया यांनी त फेरचौकशीची मागणी केली होती.न्यायालयाने निकाल दिला आहे.

खडसे बोलत असतात, मी शुद्ध चारित्र्याचा आहे. तर मग दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. क्लिन चीट आधी मिळाली होती, आता चौकशीनंतर पुन्हा क्लिन चीट मिळेल" असा टोला महाजन यांनी लगावला.

भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर ५२ मधील तीन एकर जागा 2016 मध्ये एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून तीन कोटी पंचाहत्तर लाख रुपयांना खरेदी केली . पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टॅम्प ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले.परंतु,ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचा आरोप पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केला आहे.

Girish Mahajan & Eknath Khadse
Mehbooba Mufti यांना सरकारी बंगला सोडण्याचे आदेश ; मेहबुबा मुक्ती न्यायालयात जाणार

या जागेची किंमत तीस कोटीहून अधिक असताना खडसेंनी ती पावने चार कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही जागा अब्बास उकानी यांची आहे की एम आय डी सी च्या मालकीची आहे याबद्दल न्यायालयात खटला सुरु असतानाच खडसेंनी ही जागा उकानी यांच्याकडून विकत घेतली होती.हेमंत गावंडे यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने एकनाथ खडसे ,त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई यांच्याविरुद्ध 2017 मधे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com