Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंचे पटोलेंवर आरोप; 'थोरातांनी आता बोललं पाहिजे : 'काय घडले हे फक्त...'

Balasaheb Thorat News : अपक्ष आमदार काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat News Sarkarnama

Balasaheb Thorat News : अपक्ष आमदार काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तांबे कुटुंब तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला.

या खळबळजनक आरोपानंतर तांबे काँग्रेसमध्ये (Congress) परतणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज ( ता.५) माध्यमांशी बोलत होते.

Balasaheb Thorat News
Chinchwad by-election : चिंचवड पोटनिवडणुकीचा फटका फक्त चिंचवडलाच, उर्वरित शहराला नाही

''सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना पक्ष सोडायचा असेल तर ते काँग्रेसवर टीका करणारच. पटोलेंवर जे आरोप झाले, त्याला ते (नाना पटोले) उत्तर देतील. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी याबाबत बोलले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.

तसेच यामध्ये नेमके काय घडले? हे फक्त थोरातच सांगू शकतात. असे मला वाटते. त्यामुळे सत्यजीत तांबे ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते पाहता त्यांचा काँग्रेसमध्ये परण्याचा हेतू आहे, असे मला वाटत नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Balasaheb Thorat News
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवार, नाना पटोले, राज ठाकरेंना फोन ; म्हणाले..

कसबा, चिंचवड या पोटनिवडणुकीवरही यावेळी भुजबळ यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता, असे भुजबळ म्हणाले. मात्र, आमचे नेते एकत्र बसतील व मग ही निवडणूक बिनविरोध करायची की नाही ते ठरवतील. आमचे नेते यावर निर्णय घेतील. लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com