भाजपने महाराष्ट्रासाठी खोदलेल्या खड्ड्यात संपूर्ण देशातील ओबीसी गेले!

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मध्य प्रदेश सरकारला दणका दिला आहे.
Chhagan Bhujbal Latest Marathi News
Chhagan Bhujbal Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मंगळवारी मध्य प्रदेश सरकारला दणका दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात पंचायत निवडणुकांची अधिसूचना काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रानंतर दणका बसलेले मध्य प्रदेश (Madhya Pradesh) दुसरे राज्य ठरले आहे. पण या निकालामुळे आता देशभरातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजपवर निशाणा साधला. (OBC Reservation Latest Marathi News)

न्यायालयाच्या आजच्या निकालावर बोलताना भुजबळ म्हणाले, देशात कोणत्याही राज्याने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. त्यात भाजपची सत्ता असलेली राज्यही आहेत. फक्त महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्याच काही लोकांनी न्यायालयात जाऊन हा खेळ केला. पण हा देशाला महागात पडला आहे. आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात सगळ्या देशातील ओबीसी गेले आहेत.

Chhagan Bhujbal Latest Marathi News
भाजपला दणका : महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशमध्येही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका!

ओबीसी आरक्षण मिळत नाही, हे केंद्र सरकारचे पाप आहे. आता यावर एकच पर्यात आहे. केंद्र सरकारने अध्यादेश काढून देशातील ओबीसी आरक्षण वाचवावे. त्यासाठी भाजने पुढाकार घ्यावा. त्याचे श्रेय घ्यावे पण मार्ग काढावा, असं आवाहन भुजबळ यांनी केलं. आम्ही डेटा मागत होतो. तो दिला असता तर आज देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले नसते. त्यांनी डबल गेम खेळायचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला अडचणीत आणायचे आणि मध्य प्रदेश सांभाळायचे, असं सुरू होतं, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपच्या खेळामुळे ओबीसी आरक्षण अडचणीत आले आहे. आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं? मग आता मध्य प्रदेशने काय केलं, असा प्रश्न आहे. संपूर्ण देश अडचणीत आला आहे. ह्यांची मातृसंस्था आहे. ते सांगतात आरक्षण संपवलं पाहिजे, हा मार्ग आहे का, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

Chhagan Bhujbal Latest Marathi News
ओबीसी आरक्षण तिघाडी सरकारनेच घालवले!

आता केंद्राची जबाबदारी आहे. तुमचे खेळामुळे देशाचे ओबीसी आरक्षण संकटात आले. ते वाचवायचे असेल तर वकिलांशी बोला अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण वाचवा. आमच्या विरोधात जे बोलतात त्यांनी दिल्लीत जाऊन बसावे आणि मार्ग काढावा, असं भुजबळ म्हणाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातही निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com