जाहीर खिल्ली आहे ही! मिटकरींविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यानंच थोपटले दंड

लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला.
जाहीर खिल्ली आहे ही! मिटकरींविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यानंच थोपटले दंड
Bajirao Dharmadhikari, Amol MitkariSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची मंत्रोच्चारणा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याला आता राष्ट्रवादीतूनच विरोध होऊ लागला आहे. परळी वैजनाथचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे परळीचे अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी (Bajirao Dharmadhikari) यांनी मिटकरींविरोधात दंड थोपटले आहेत. मिटकरी यांचं भाषण म्हणजे जाहीर खिल्ली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला. मिटकरी यांच्याविरुध्द सकाळी पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनाचा विरोध केला. तसेच मिटकरी यांचं समर्थन केलं.

Bajirao Dharmadhikari, Amol Mitkari
राज ठाकरेंच्या घोषणेनं 'यूपी'तही हादरे; योगींचं ठाकरे सरकारच्या पावलावर पाऊल

तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीतून मिटकरींविरोधात पहिला आवाज उठला आहे. बाजीराव धर्माधिकारी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांनी मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हिंदू धर्मात कधीच मम् भार्या समर्पयामी असा मंत्री नसतो. कदाचित मिटकरीला आमदारकीसाठी सापडलेले हे तंत्र असू शकते..जाहीर खिल्ली आहे ही, असं म्हणत धर्माधिकारी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर राडा

अमोल मिटकरी मानसिक रुग्ण असल्याचे म्हणत संतप्त झालेल्या आंदोलकांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातही घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच अमोल मिटकरींवर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ब्राम्हण महासंघाच्या आंदोलकांना विरोध करत मिटकरींची भाषा आणि भाषाशैली योग्यच असल्याचा दावा केला आहे.

ब्राम्हण महासंघाच्या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले, जर त्यांनी अश्लील घोषणा दिलेल्या असतील तर त्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत, मात्र नेत्यांबद्दल वाईट घोषणा देणार असाल, तर कुणीही हे सहन करणार नाही, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. तसेच अमोल मिटकरींच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, हे भाषण म्हणजे हा त्यावेळचा एक विनोद होता. मात्र महाराष्ट्रात आज काल विनोद बुद्धी राहिलेली नाही. राजकीय रंग देऊन, इश्यू करून त्याचे फायदे घ्यायचे धंदे सुरू आहेतअसे प्रत्त्युत्तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.