भाजपमधील 60 आमदारांना खडसेंनी..! राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांचा मोठा दावा

विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी चुरस...
Anil Patil Latest News, Devendra Fadnavis News,
Anil Patil Latest News, Devendra Fadnavis News, Sarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून सर्वच पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे. महाविकास आघाडीची मतं फुटून पाचवा उमेदवार निवडून येईल, असा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील प्रतोद अनिल पाटील यांनी मोठा दावा केला आहे. (NCP Leader Anil Patil Latest News)

भाजपकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पराभवासाठी प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील काही आमदार भाजपला मतदान करतील, असा दावा भाजपच्या काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यावर बोलताना पाटील यांनी भाजपने केलेला दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

Anil Patil Latest News, Devendra Fadnavis News,
एकनाथ शिंदेंची नाराजी कायम? सेना नेत्यांनी आग्रह करूनही बोलले नाहीत!

माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, एकनाथ खडसे यांच्याबाबत भाजपने केलेला दावा चुकीचा आहे. भाजपमधील 106 पैकी 60 आमदारांना एकनाथ खडसेंनी जवळून बघितले आहेत. त्यातील सगळ्या खाचाखोचा माहिती आहेत. त्यातील काही आमदार कुठलीही कामे होत नसल्याने आणि देशातील सध्याच्या स्थितीमुळे ते आमच्या संपर्कात आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मतदान कमी झालेले दिसेल.

दरम्यान, शरद पवार यांनी आम्हाला सुचना दिल्या आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रत्येक आमदाराला वैयक्तिक भेटून त्यांच्या अडचणी, त्यांचं म्हणणे ऐकून त्यावर मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असतील. मतांचा कोटा किती ठरवावा, पसंती क्रम कसे द्यावेत, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत होईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

Anil Patil Latest News, Devendra Fadnavis News,
हिंदुस्थान पेटणार..! भाजप नेत्याकडून राहुल गांधींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

भाजपच्या पायाखालची वाळू सरकली

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडे 106 आमदार होते, त्यामुळे त्यांची मतं शिल्लक होती. त्यामुळे त्यांनी व्युहरचना केली होती. तशी स्थिती आता नाही. त्यांना 20 मतं मिळवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपकडून अफवा पसरवल्या जात आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com