राजकारण तापलं! फडणवीसांच्या विरोधात अनिल गोटेंची थेट ईडीकडे धाव

फडणवीस यांच्या सरकारला दाऊदशी निगडित कंपनीकडून देणगी मिळाल्याचा खळबळजनक आरोप गोटेंनी केला आहे.
Devendra Fadnavis and Anil Gote
Devendra Fadnavis and Anil Gote Sarkarnama

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनात गँगस्टर दाऊद इब्राहिमवरून रणकंदन सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बॉम्ब टाकला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दाऊदशी निगडित कंपनीकडून देणगी मिळाल्याचा खळबळजनक आरोप गोटेंनी केला आहे. या प्रकरणी गोटेंनी सक्त वसुली संचालनालयाकडे (ED) तक्रार दाखल केली आहे.

तत्कालीन फडणवीस सरकारने खंडणी गोळा केल्याप्रकरणी अनिल गोटे यांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात तक्रार नोंदवली आहे. याबाबत त्यांनीच माहिती दिली असून, फडणवीसांची चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत बोलताना गोटे म्हणाले की, गँगस्टर दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला इक्बाल मिरची हा देशद्रोही असून, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. त्याच्याशी निगडित असलेल्या आरकेडब्लू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक राकेश वाधवा यांच्या बँक खात्यातून फडणवीस सरकारला 2014 ते 2015 मध्ये 10 कोटी रुपये देणगी मिळाली होती. राकेश वाधवा पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून, तो सध्या तुरुंगात आहे. राष्ट्रवादीचे अनेक मंत्री ईडीच्या रडारवर आले आहेत.

Devendra Fadnavis and Anil Gote
राष्ट्रवादीचा दे धक्का! भाजपमध्ये गेलेले पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते स्वगृही परतणार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. यामुळे केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर सुरू असल्याचा दावा राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना हे घटक पक्ष करीत आहेत. आता गोटेंनी थेट फडणवीसांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis and Anil Gote
राज्यपाल निघून जाताच विधानभवनाच्या पायऱ्यांवरच आमदाराचं 'खाली डोकं वर पाय'!

नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारीला अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे थेट आणि कमी पैशात जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे. याचबाबतचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने कोठडी घेण्यापूर्वी मलिक यांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यानंतर त्यांना कारागृहात नेण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in