अजितदादा भाजपमध्ये जातील का? मिटकरी म्हणतात...

Amol Mitkari News : अतुल भातखळकर यांनी काढला चिमटा
Amol Mitkari News
Amol Mitkari NewsSarkarnama

Amol Mitkari News : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा अधुन-मधून सुरु असते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मिटकरी यांनी स्पष्ट उत्तर दिले.

'सरकारनामा ओपन माईक' सिजन 2 या कार्यक्रमात अमोल मिटकरी बोलत होते. यावेळी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद, मनसे नेते संदीप देशपांडे, शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनिषा कायंदे उपस्थित होत्या.

Amol Mitkari News
पुन्हा जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात लढणार का? दिपाली सय्याद यांनी स्पष्टच सांगितले

अजित पवार भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारत मिटकरी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न नेत्यांनी केला. मात्र, अमोल मिटकरींनी स्पष्ट उत्तर देत अजितदादा भाजपमध्ये जाणार नाहीत. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला तो भाजपमध्ये विलीन करायचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे एक कुटुंब आहे. त्यामुळे या पक्षातून कोणीच बाहेर पडणार नाही, असे आपल्या स्टाईलमध्ये मिटकरी यांनी सांगितले.

अजित पवार यांची कॉफी करता का? या प्रश्नावर मिटकरी यांनी स्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले, दादा माझे मार्गदर्शनक आहेत. मात्र, मी त्यांनी कॉपी करत नाही. ते सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. मी सात आठ वाजता उठतो. अजितदादा स्पष्ट बोलतात, वेळेचे निजोयन पक्के असते. स्वभावगुण त्यांचे जे आहे. ती माझी पात्रता नाही. यावर भातकळकर यांनी कोटी केली. ते म्हणाले, मिटकरी सुप्रिया ताईंना कॉफी करतात.

Amol Mitkari News
काँग्रेस सोडणार का? सत्यजीत तांबेंचे भन्नट उत्तर

भाषणे कायम गाजतात, त्यासाठी व्हॉट्सअॅपच्या मेसेजेसचा वापर करता का? असा सवाल केला असता, मिटकरी म्हणाले, जे चांगले आणि माहिती देणारे मेसेज असतात ते वाचतो. आणि त्याचा उपयोग भाषणांमध्ये करतो. यावर भातखळकर यांनी चिमटा काढला. ते म्हणाले, व्हॉट्सअॅप युनिव्हरसिटी उपयोग कोण करते ते पाहिले का? यावर एकच हास्यकळळोल झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com