Ajit Pawar News: राज्यात बदल्यांचा 'बाजार' तेजीत; अजित पवारांचा गंभीर आरोप

Shinde-Fadnavis government: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत राज्यातील सर्वच विभागात बदल्यांचा बाजार तेजीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच वनविभागाच्या बदल्यांमध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या सुरू आहेत, असंही अजित पवार म्हणाले. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, "बदल्यांचे अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना असले तरी मंत्रालयातून आलेल्या यादीमधील ज्या बदल्यांचे आदेश दिले तेच आदेश पाळावेत, असे तोंडी आदेश या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. इतकच काय तर बदल्याकरून काही मंत्री व अधिकारी परदेशात गेले. मात्र, बदल्या होणे आणि यांनी परदेशात जाणे हा योगायोग आहे का? हा संशोधनाचा भाग आहे", असं ते म्हणाले.

Ajit Pawar
Cabinet Expansion: मंत्री कोण होणार यापेक्षा कुणाला डच्चू मिळणार याचीच चर्चा अधिक; भाजपाच्या मंत्र्यांमध्ये धास्ती !

ते पुढे म्हणाले, "माजी खासदार राजू शेट्टी यांनी बदल्यांचे 'रेटकार्ड' मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवलं होतं. त्यामध्ये जिल्हाधिकारीपदाच्या बदल्यांचा रेट किती? कोणत्या आमदाराने पत्र दिले तर बदली करावी, असं ठरलेलं असून काही विशिष्ट आणि मोजक्या आमदारांना बदल्यासाठी शिफारस करण्याचे अधिकार दिले, असा गंभीर आरोप यावेळी अजित पवार यांनी केला.

Ajit Pawar
Ramesh Kadam Bail : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांना आठ वर्षानंतर जामीन

याबरोबरच कृषी सहायक पदाच्या बदलीसाठीचा रेट तीन लाख रुपये आहे, असा आरोप करत याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमातून छापून आल्याचंही अजित पवार म्हणाले. त्यामुळे लाखो रुपये देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे काम करतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी अजित पवार यांनी राज्य शासनाच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमावरही टीका केली.

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com