दीपक पांडेंना वेळीच आवरा; अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीत सुनावले...

Ajit Pawar|NCP|Balasaheb Thorat: राज्याच्या सेवेत राहून कारस्थान रचणाऱ्या अधिकाऱ्यावर नजर ठेवा, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
Ajit pawar
Ajit pawarSarkarnama

मुंबई : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे न्यायदंडाधिकारी म्हणून असलेले अधिकार काढा, अशी मागणी करत महसूलच्या अधिकाऱ्यांना दहशतवादी संबोधणारे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे (CP Deepak Pandey) यांच्याबाबत आज (ता.7 एप्रिल) मंत्रिमंडळ बैठकीत संतापाची लाट उसळली.

एखादा अधिकारी आपली कार्यकक्षा सोडून दुसऱ्या विभागातील अधिकाऱ्याबाबत असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवूच कसा शकतो, अशा अधिकाऱ्यामध्ये हे धाडस कुठून येते. असे अधिकारी वेळीच ओळखून त्यांचा बंदोबस्त करायला हवा, असा संताप बैठकीत उमटला.

Ajit pawar
मशिदींवरील भोंग्याचा वाद चिघळण्याची शक्यता; 'अजान'ची तुलना केली 'अखंड पाठा'बरोबर

'महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या आयुक्तांना वेळीच सुनावले हे योग्य झाले,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाल्याचे समजते. राज्याच्या सेवेत राहून कारस्थान रचणाऱ्या अधिकाऱ्यावर नजर ठेवा, असे त्यांनी सांगितले आहे. राज्याचा पगार घेऊन सरकारला (Maharashtra Government) बदनाम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना आतातरी थारा देऊ नका, अशा शब्दात अनेक मंत्र्यांनीही रोष व्यक्त केल्याची माहिती आहे.

Ajit pawar
'थोरात माझे आदर्श मात्र मी माझ्या पत्रावर ठाम'

या अगोदर तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी अकस्मात राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. परमबीर सिंग यांनी सरकारच्या विरोधात कट रचून बदनामी केली. आता पुन्हा महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेत काही अधिकारी वागत असतील तर त्यांना पायबंद घालावाच लागेल, अशा संतप्त प्रतिक्रिया देखील काही ज्येष्ठ मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे माहिती मिळाली.

Ajit pawar
मी जे राऊत यांच्याविषयी वारंवार सांगत होतो... तसेच घडले

दरम्यान, नांदेड मधील व्यावसायिकाच्या हत्येचे देखील तीव्र पडसाद या बैठकीत उमटले. नांदेडचे पोलिस अधीक्षकांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली असून अशा प्रकारची निर्घृण हत्या होणे, ही गंभीर बाब असल्याची खंत देखील मंत्रिमंडळाने व्यक्त केल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com