नगरपालिका निवडणुकीत आघाडीत राहायचे की नाही ? ; अजितदादांच्या भाषणाकडे लक्ष

सत्तांतरानंतर अजित पवार यांची प्रथमच बारामतीत सभा होत असल्याने ते या सभेत काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
 Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

बारामती : बारामती नगरपालिका (Baramati) व माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) जाहीर मेळाव्यात बोलणार आहेत. सत्तांतरानंतर त्यांची प्रथमच बारामतीत सभा होत असल्याने ते या सभेत काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. (ajit pawar news update)

बारामती नगरपालिकेसह सर्वच संस्थांवर अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व आहे, मात्र राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीचे भवितव्य कसे असेल, आगामी निवडणूकांना सामोरे जाताना महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायचे की शिवसेना कॉंग्रेससोबत जायचे या बाबतची भूमिका संदिग्ध असल्याने अजित पवार आज काय सूचना देतात याकडेच कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

 Ajit Pawar
विरोधीपक्षनेते अजितदादांच्या कामांचा सपाटा सुरु..

नगरपालिकेसाठी इच्छुकांची संख्याही मोठी असल्याने आजच्या मेळाव्यास मोठी गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थितीवर तसेच जिल्ह्याच्या राजकारणाबाबत पवार काय बोलणार या बाबत उत्सुकतेचे वातावरण आहे.

सत्तांतरानंतर आता राष्ट्रवादी विरोधी पक्ष असल्याने कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याबाबत तसेच कोणत्या मुद्यांवर विरोध करायचा या बाबतही अजित पवार मार्गदर्शन करतील, विरोधी पक्ष असल्याने कार्यकर्त्यांचीही भूमिका नेमकी काय असावी या बाबतही ते बोलतील असा अंदाज आहे.

 Ajit Pawar
Shivsena : आजारपणाचा फायदा घेत 'त्यांनी' घात केला; ठाकरेंची भावनिक साद

राज्यातील सत्तांतरानंतर आज अजित पवार (Ajit Pawar) हे प्रथमच विरोधी पक्षनेते म्हणून बारामतीत ( Baramati)आले. नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने आज अधिकारी उपस्थित नव्हते, मात्र पदाधिका-यांसमवेत त्यांनी विविध विकासकामांना भेटी देत सूचना केल्या. ही कामे वेळेत मार्गी लावण्यासाठीही त्यांनी संबंधितांशी चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in