Bhagat Singh Koshyari : इतिहासात शुन्य मार्क, तर तुकडी ढ..; जाता जाताही कोश्यारींना राष्ट्रवादीने डिवचले

NCP : राष्ट्रवादीने कोश्यारी यांच्याबाबत एक उपहासात्मक मार्कशीट सोशल मीडियावर शेअर केले
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh KoshyariSarkarnama

NCP News : आपल्या विधानांनी वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे आज पदमुक्त झाले. तसेच कोश्यारींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.

सत्ताधारी भाजप-शिंदे गटाकडून राज्यपालांच्या कामाबाबत कौतुक करण्यात आले. मात्र, जाता-जाताही कोश्यारींना राष्ट्रवादीने पुन्हा एकदा डिवचले आहे.

इतिहासाला शुन्य मार्क देत आणि प्रगती न म्हणता अधोगती पुस्तक असं म्हणत टोला लगावला. राष्ट्रवादीने कोश्यारी यांच्याबाबत एक उपहासात्मक मार्कशीट तयार करत ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप विद्यालयाची ही मार्कशीट असून त्यामध्ये ढ तुकडी असाही उल्लेख करण्यात आला आहे.

Bhagat Singh Koshyari
Jitendra Awhad : आव्हाडांनी शेअर केली "एका बाबाची गोष्ट.." ; पिता म्हणून हे सगळं सहन करायचं ?

तसेच याला प्रगती पुस्तक न म्हणता अधोगती पुस्तक असं म्हणत त्यामध्ये विविध विषयांचे मार्क दाखवण्यात आलेत. भगतसिंह कोश्यारी यांची तुकडी ढ असं या मार्कशीटवर लिहिण्यात आलं आहे.

तसेच हजेरी क्रमांक ४२ असंही लिहिण्यात आलंय. याबरोबरच विषयाचे मार्कही देण्यात आलेत. यामध्ये इतिहासला (00), भूगोल (३५), नागरिक शास्त्र (१७), सामान्य ज्ञान (३४) कला (१००) असे मार्क देण्यात आले आहेत.

Bhagat Singh Koshyari
CM On Koshyari : मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्राला कोश्यारींची ओळख ‘या’ कारणांमुळे कायम राहील’

या मार्कशीटवर शेरा देखील देण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेवर पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता बालवाडीपासून सुरुवात करणे योग्य राहील, असं म्हणत राष्ट्रवादीने कोश्यारींना डिवचलं आहे.

दरम्यान, हे मार्कशीट राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडवरून शेअर करण्यात आलं आहे. त्यामुळे जाता-जाताही भगतसिंह कोश्यारींना राष्ट्रवादी काँग्रेसने डिवचले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com