Eknath Khadse : शिंदेंनी 50 आमदारांना तिकीट वाटलयं, बाशिंग बांधलेल्या भाजप आमदारांचे काय ?

शिंदे गटाच्या 50 आमदारांचे तिकीट वाटप करून मोकळे झाले. त्यामुळे भाजपाच्या 50 आमदारांचा तिकीट आता कापले जाणार हे खरं आहे.
Eknath Khadse, Eknath Shinde
Eknath Khadse, Eknath Shindesarkarnama

मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी आज (सोमवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार गिरीश महाजन (girish mahajan) यांच्यावरही टीका केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. (eknath khadse latest news)

एकनाथ खडसे म्हणाले, "शिंदे गट आणि भाजप यांच्या भानगडी होणारच आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं माझे 50 आमदार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. शिंदेंनी मुक्ताईनगर पाचोरा जळगाव जिल्ह्यातील आमदार निवडून आणलेच पाहिजे. मग काय भाजपचे बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांचा गरज काय ? भाजपचा पत्ता कट होईल, यांच्या पुढे चांगल्याच भानगडी होतील. शिंदे गटाच्या 50 आमदारांचे तिकीट वाटप करून मोकळे झाले. त्यामुळे भाजपाच्या 50 आमदारांचा तिकीट आता कापले जाणार हे खरं आहे,"

Eknath Khadse, Eknath Shinde
TET Exam Scam : माझा मुलगा परीक्षेला बसलाच नाही ; "मला मंत्रीपदाची काळजी नाही,"

ठाकरे सरकार पडल्यानंतर जळगाव येथे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दीक वाद आणखीच वाढला आहे. "संजय राऊत यांच्यानंतर पुढचा नंबर हा एकनाथ खडसे यांचा असणार आहे," असा दावाच महाजनांनी केला होता. त्यांला खडसेंनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

'हम तो डुबेंगे सनम..

'कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल, मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा 'हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे' असं म्हणत खडसेंनी गिरीश महाजन यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.

विरोधकांना फक्त नाथाभाऊच दिसतो

"ईडी नावाचा प्रकार आता घरोघरी पोहोचला आहे. माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागलं असेल नसेल ते लागलं काय झालं काहीच नाही. विरोधकांना उठलं की फक्त नाथाभाऊच दिसतो," असे खडसे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com