राष्ट्रवादीच ठरलं.. आता भाजपला जशास तसे उत्तर!

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि सर्व खासदारांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच ठरलं.. आता भाजपला जशास तसे उत्तर!
शरद पवारsarkarnama

पुणे : भाजपकडून (BJP) केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. असेच चित्र राज्यात दिसत आहे. मात्र, आता या कारवाईला न डगमगता राष्ट्रवादीने (NCP) ठामपणे सामोरे जात लढण्याचे ठरवले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

शरद पवार
राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा ‘वॉच’

रा्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि सर्व खासदारांची बैठक आज (ता.१२ ऑक्टोबर) संपन्न झाली. यामध्ये काल (ता.११ ऑक्टोबर) लखीमपुर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटनेचे व जनतेचे आभार मानण्यात आले. तसेच, याबरोबर आगामी काळात येणाऱ्या सणांच्या दृष्टीने व्यापाऱ्यांसाठी दुकानाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय पक्ष पातळीवर घेण्यात आला आहे. घेतलेला हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समोर मांडण्यात येईल, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.

शरद पवार
एकनाथ खडसे अडचणीत; पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अटक वॅारंट जारी

याबरोबरच या बैठकीत केंद्रीय यंत्रणेकडून सातत्याने राज्यातील मंत्र्यांना लक्ष केले जात यावर चर्चा झाली. याबाबत आता यापुढे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षातील कोणीही डगमगणार नसून याविरोधात लढणार असल्याचे ठरले असल्याची माहिती मलिक यांनी सांगितली आहे. तसेच, राज्यातील राजकीय परिस्थितीचा व जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा यावेळी घेण्यात आला. तर, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकी संदर्भातील जबाबदाऱ्या मंत्र्यांना सोपवण्यात आले असल्याचे सांगितले.

दसऱ्यानंतर पक्षाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शिबीरे भरवण्यात येणार आहेत. तर, आगामी निवडणुका कशाप्रकारे लढवाव्या यासंदर्भातील अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल समोर आल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही मलिक स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.