Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी पक्षाच्या समितीने पवारांचे मनपरिवर्तन करावे; अशोक चव्हाणांचा आग्रह

Ashok Chavan : शरद पवारांची पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा
Ashok Chavan, Sharad Pawar
Ashok Chavan, Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar and Ashok Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर आले. दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Ashok Chavan, Sharad Pawar
Sharad Pawar: शरद पवार यांच्या पदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे गहिवरले...

काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी त्यांचा निर्णय खटकत असल्याची भावना व्यक्त केली. अशोक चव्हाण म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर लक्ष आहे. पवार यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. मात्र पवारसांहेबांसरखा अनुभवी, ज्येष्ठ नेत्याने अशा पद्धतीने अचानक राजिनामा देणे ही खटकणारी बाब आहे."

Ashok Chavan, Sharad Pawar
Sharad Pawar Retirement: "भाकरी फिरवण्याचे संकेत पण तवाच फिरवला, इतिहासाची पुनरावृत्ती.." ; राऊतांचं सूचक ट्वीट

सध्या केंद्रपातळीवर विरोधक एकत्र येत असताना पवारांची भूमिका न पटणारी असल्याचेही चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण म्हणाले, "सध्या केंद्रपातळीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहे. ते भाजपच्या विरोधात नवीन फ्रंट तयार करत आहेत. अशा स्थितीत शरद पवारांची भूमिका महत्वाची ठरते. दरम्यान, त्यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा घेतलेला निर्णय पटणारा नाही. त्यांनी असे करायला नको होते."

Ashok Chavan, Sharad Pawar
Sharad Pawar Retirement News: आमच्या वडीलांच्या जागी तुम्ही उभे राहिलात, निर्णय मागे घ्या; नवाब मलिकांच्या मुलींची पवारांना साद

दरम्यान, पवारांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे (MVA) नुकसान होईल, असेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, "महाविकास आघाडीचा पाया पवारांनी रचला. आता त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र नेतृत्व बदलत राहतात. याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. मात्र महाविकास आघाडीतील प्रक्रियेतील एक अनुभवी नेता बाहेर पडला त्यामुळे नुकसान होईल. त्यामुळे त्यांना पक्षात राहूनच काम करावे. आता समितीने त्यांचे मनपरिवर्तन करावे, अशीच आमची भूमिका आहे."

Ashok Chavan, Sharad Pawar
Sharad Pawar Retirement News: नरहरी झिरवळांची पवारांना भावनिक साद; म्हणाले,''आमचं काही चुकलं असेल तर...''

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची गळ घातली. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला.

अजित पवार म्हणाले, "पवारसाहेबांनी भाकरी फिरवायची असते, असे वक्तव्य केले होते. आता तुम्ही म्हणता त्यांच्यापासून सुरुवात नको. पण त्यांनी आता निर्णय घेतला आहे. मी काकींशीही (शरद पवारांच्या पत्नी) बाललो आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की साहेब निर्णय मागे घेणार नाहीत. ते यावर ठाम आहेत. वयाचानुसार आज ना उद्या हा निर्णय घेण्याची वेळ येणारच होती. ते अध्यक्ष नसले तरी आपल्याला त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com