भिडे, एकबोटेंना कधी भेटलो नाही! शरद पवारांचं उलटतपासणीत उत्तर

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात शरद पवार यांची आयोगासमोर उलटतपासणी सुरू आहे.
NCP Chief Sharad Pawar Latest News, Sambhaji Bhide News, Koregaon Bhima case Latest Marathi News
NCP Chief Sharad Pawar Latest News, Sambhaji Bhide News, Koregaon Bhima case Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) आणि मिलिंद एकबोटे यांना कधी भेटलो नाही, त्यांची व्यक्तिश: ओळख नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची म्हटलं आहे. कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे १ जानेवारी २०१८ ला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगासमोर आता पवारांची उलटतपासणी सुरू आहे. यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं आहे. (Koregaon Bhima case Latest Marathi News )

निवृत्त न्यायमूर्ती जे.एन पटेल आणि आयोगाचे सदस्य सुमित मलिक यांच्यासमोर पवारांचा जबाब नोंदवला जात आहे. आयोगाकडून विचारलेल्या प्रश्नांना पवारांनी उत्तरं दिली असून आता त्यांची उलटतपासणी सुरू आहे. तुकाराम गवारे यांचे वकील बनसोडे यांच्याकडून पवारांना विविध प्रश्न विचारण्यात आले.

अॅड. बनसोडे यांनी पवारांना विचारलेले प्रश्न :

प्रश्न : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तुमचं घर हे केंद्रस्थानी होतं?

उत्तर : मी केवळ कोरगाव भीमासाठी आलोय. मी त्यावेळी 16 वर्षांचा होतं. त्यामुळे इतकं जुनं मला काही आठवत नाही

प्रश्न : भिडे आणि एकबोटे याना ओळखता का?

उत्तर : वर्तमानपत्रात त्यांच्याविषयी वाचले. कधी भेटलो नाही, व्यक्तिशः ओळख नाही.

प्रश्न : त्यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, वळू बुद्रुक इथं एक ट्रस्ट बनवलीय याची तुम्हाला माहितीय का?

उत्तर : मला माहिती नाही.

NCP Chief Sharad Pawar Latest News, Sambhaji Bhide News, Koregaon Bhima case Latest Marathi News
घरात बसून घरातल्यांना अल्टीमेटम द्यावा! अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं

प्रश्न : तुम्ही महाराष्ट्र सरकार, प्रशासन यांना ही घटना झाल्यावर काही सूचना दिल्या का?

उत्तर : जेव्हा हा आयोग नेमला गेला तेव्हा मला नोटीस आली की, या प्रकणी सूचना द्याव्या. मी माझ्या प्रतिज्ञापत्रात सूचना दिल्या आहेत.

प्रश्न : एल्गार परिषदेबाबत तुम्ही काय बोलला होता?

उत्तर : माझं प्रेस स्टेटमेंट असण्याची शक्यता आहे. एल्गार परिषदला जे हजर नव्हते, त्यांच्यावर केस झाल्या. हे योग्य नाही हे विधान मी केलेलं आहे. मी एल्गार बद्दल बोललो, कोरेगाव भीमा बद्दल नाही.

प्रश्न : एल्गारचा तपास करा, पुन्हा SIT नेमा, याबाबत तुम्ही तेव्हा मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते?

उत्तर : खरं आहे. एल्गार परिषदेबाबत SIT नेमावी, अशी मी भूमिका घेतली होती. जस्टिस सावंत त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली परिषद झाली. त्यांना वादात खेचलं होतं.

NCP Chief Sharad Pawar Latest News, Sambhaji Bhide News, Koregaon Bhima case Latest Marathi News
प्रकाश आंबेडकर, फडणवीस, ठाकरेंना जबाबाला बोलवावे का? आयोगाचा पवारांना सवाल

आयोगाकडून विचारण्यात आलेले प्रश्न व पवारांनी दिलेली उत्तर :

प्रश्न : एखाद्या वक्तव्यानंतर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं तेव्हा त्याची जबाबदारी कुणाची?

उत्तर : लोकप्रतिनीधींनी जाहीर वक्तव्य करताना जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यांच्या वक्तव्यात प्रक्षोभक वक्तव्य असता कामा नयेत, जेणेकरून समाजातील विविध स्तरात त्याचे पडसाद उमटून जातीय तेढ निर्माण होईल. जर तसं होत असेल तर त्याची जबाबदारी त्या नेत्याचीच असेल.

प्रश्न : कुठल्याही राजकीय पक्षाला सभेसाठी जागा देताना काय गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात?

उत्तर : अश्या सभांना जागा देताना त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून सभेनंतर तिथं कोणतीही तणाव निर्माण झाल्यास पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.

NCP Chief Sharad Pawar Latest News, Sambhaji Bhide News, Koregaon Bhima case Latest Marathi News
घरात बसून घरातल्यांना अल्टीमेटम द्यावा! अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं

प्रश्न : तुमचं प्रतिज्ञापत्र कायद्यातील कोणत्या तरतूदींच्या आधारे आहे?

उत्तर : आपल्याकडील उपयुक्त माहिती सरकारला देणं हे आपलं कर्तव्य आहे. जर माझ्या माहितीनं सरकाला काही मदत मिळणार असेल तर ते जरूरीचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे सध्याचं आयपीसी कलम 124 A हे ब्रिटीश कालीन आहे. मात्र हल्ली त्याचा वापर सर्रासपणे चुकीच्या पद्धतीनं होताना दिसतोय. तो थांबायला हवा असं मला वाटत.

प्रश्न - मात्र ही गोष्ट तुम्ही एक राज्यसभा सदस्य या नात्यानं संसदेतही मांडू शकता, मग तिथं हे का मांडत नाही?

उत्तर : होय, बरोबर आहे. मला वाटतं जेव्हा मला योग्य वेळ वाटेल तेव्हा मी तिथंही या गोष्टी मांडेन.

NCP Chief Sharad Pawar Latest News, Sambhaji Bhide News, Koregaon Bhima case Latest Marathi News
त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली; केवळ 20 मंदिरांकडे भोंग्याची परवानगी

प्रश्न : गंभीर गुन्ह्याची माहिती गोळा करत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे. माहिती मिळाली की कारवाई करावी की माहिती वरिष्ठांना सांगून त्यांच्या सूचनांची वाट पाहावी.

उत्तर : महाराष्ट्र पोलीस मॅन्युअल मध्ये अशी परिस्थिती झाली. पोलीस दलाला थेट कारवाई करण्याचे मार्गदर्शक तत्व दिले आहेत त्या आधारे त्यांनी कारवाई करावी.

प्रश्न : प्रकाश आंबेडकर यांनी बंद पुकारला ,त्याचे तीव्र पडसाद उमटले, नुकसान झाले याची जबाबदारी कोणाची?

उत्तर : मला याबाबत काही बोलायचं नाही. इतर कोणी काय भूमिका घेतली कार्यक्रम घेतले, त्याचे काय परिणाम झाले. ह्यात जायची मला आवश्यकता वाटत नाही.

प्रश्न : जबाब नोंदवायला देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे, रामदास आठवले यांना आयोगपुढे बोलवावे का?

उत्तर : या लोकांना बोलवावे या निष्कर्षापर्यंत आयोग आले असेल तर त्यांनी याबाबत ठरवावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com