राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडले अन् शरद पवारांनी दोनच वाक्यात दिलं उत्तर...

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. 5) केली.
Raju Shetti, Sharad Pawar
Raju Shetti, Sharad PawarSarkarnama

नवी दिल्ली : स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून (MahaVikas Aghadi) बाहेर पडत असल्याची घोषणा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मंगळवारी (ता. 5) केली. यावेळी शेट्टी यांनी आघाडीतील नेत्यांवर अनेक गंभीर आरोपही केले. शेट्टी यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दोनच वाक्यात उत्तर दिलं.

हातकंणगले तालुक्यातील चोकाक येथे मंगळवारी (ता. ५ एप्रिल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. पण शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, पुढील निवडणुकीनंतरह आपलंच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.

राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडल्याबाबत विचारले असताना पवार यांनी दोनच वाक्यात उत्तर दिलं. 'त्यांचा हा निर्णय आताचा नाही. मागील वर्षापासून हे सुरू होतं,' असं म्हणत पवारांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडताना अनेक गंभीर आरोपही केले होते. राज्यातील जलविद्युत प्रकल्प खासगी करण्याचा घाट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी घातला आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला होता.

शेट्टी म्हणाले होते की, एक नाही तर अनेक धोरणं महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतली आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने मदत द्यायला पाहिजे होती. पण, दोन्ही सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी; म्हणून पदयात्रा काढली. त्या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीला बोलवलं होतं. पण, त्याठिकाणी त्यांनी सांगितलं एक आणि केलं दुसरंच.

निवडणूक लढवता यावी; म्हणून आपण चळवळ उभा केली नाही. चळवळ टिकावी; म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला आहे. एनडीएला पाठींबा देण्याचा निर्णय का घेतला, तर घोटाळा झाल्याचे वातावरण तयार झाले होते. अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांचे मत झाले होते की एक स्वछ सरकार पाहिजे. काळा पैसा भारतात आणणारे कुणीतरी पाहिजे; म्हणून (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्तीने आम्ही ‘एनडीए’मध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी आम्ही मोदी यांना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहात, हे विचारलं होतं. त्यावेळी मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार, असं बोलले होते. त्याचवेळी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करणार, असं आश्वासन दिलं, तर शेतकरी तुमच्याबरोबर येईल, असं मी म्हणालो होतो, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com