
मुंबई : आगामी मुंबई आणि राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची मुंबई आज महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकांमध्ये पदाधिकारी आणि नेत्यांना अनेक महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ दिग्गज नेत्यांच्या खांद्यावर १४ महापालिकांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे यातून मुंबई महापालिकेला वगळण्यात आले आहे. (Sharad Pawar | NCP Latest News)
आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत मंत्र्यांचे जनता दरबार लावून घेण्याच्या सुचना दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार हे नंतर ठरेल पण आता तयारीला लागा, असे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. तसेच शिवसेना आणि काँग्रेस नेत्याबरोबर चर्चा करा आणि आघाडी करण्यात काय समस्या येतात याची माहिती घ्या, अशा सुचना शरद पवार यांनी उपस्थित सर्व मंत्र्यांना दिल्या. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीचाही आढावा घेण्यात आला. आमदार योग्य पद्धतीने मतदान करतील याची खबरदारी आणि मत वाया जाऊ न देण्याची काळजी घेण्याची सूचनाही पवार यांनी मंत्र्यांना केली.
महापालिका निवडणुकांच्या जबाबदारीचे मंत्र्यांना वाटप
अर्थमंत्री अजित पवार :
पुणे
पिंपरी चिंचवड
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
ठाणे
नवी मुंबई
कल्याण-डोंबिवली
वसई-विरार
उल्हासनगर
खासदार प्रफुल्ल पटेल
नागपूर
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
अमरावती
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
नाशिक
राज्यमंत्री दत्तामामा भरणे
सोलापूर
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.