होऊन जाऊ द्या! जातनिहाय जनगणनेसाठी आता पवारांचाच पुढाकार

राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव करण्यात आला आहे.
NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News
NCP Chief Sharad Pawar Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : बिहारमधील नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मित्रपक्ष असलेल्या भाजपलाही जुमानले नाही. त्याचाच आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातनिहाय जनगणनेबाबत आक्रमक भूमिका घेतली. एकदा कळू द्या देशाला की नक्की किती संख्या आहे. त्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल, वेळप्रसंगी रस्त्यावर यावे लागेल, असं पवार म्हणाले आहेत. (NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने बुधवारी मुंबईत राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होत. या अधिवेशनात ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावाचा संदर्भ देत पवार म्हणाले, ओबीसींची नक्की लोकसंख्या किती, याबाबतची शंका उपस्थित केली जाते. केंद्र सरकारने ओबीसींची जातीय जनगनणा करावी, असा ठराव आज केला आहे. (OBC Rservation Latest Marathi News)

NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News
एकत्र लढण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता, मग दोन दिवसांत मध्य प्रदेशनं असं काय केलं?

एकदा कळू द्या देशाला की नक्की किती संख्या आहे. ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथे कुणी फुकट काही मागायला येत नाही. न्यायाचा जो अधिकार आहे, तो मिळाला पाहिजे. तो किती मिळाला पाहिजे हे ठरवायचं असेल तर जनगणनेशिवाय गत्यंत्तर नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी काल हा प्रश्न उपस्थित केला. भाजप हे त्यांचे सहकारी आहेत. पण त्यांनी जनगणना पाहिजेच, असं भाजपला सांगितलं. मला आज ज्यांच्या हातात देशाची सुत्रं आहेत, त्या लोकांकडून हा निर्णय होईल, असं वाटत नाही. आपल्याला एकत्र यावे लागेल, वेळप्रसंगी रस्त्यावर यावे लागेल. देशात सत्ता असलेल्या लोकांची मानसिकताच वेगळी आहे, अशी टीकाही पवारांनी केली. त्यामुळे आता महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News
दहा दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम; कपिल सिब्बल यांनी फोडला बॉम्ब

''आरएसएसचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी सांगितले होते की, 'यापध्दतीची जनगणना मला अजिबात मंजूर नाही. अशी जनगणना झाली तर समाजातील एकीवर प्रहार होईल. समाजात एकप्रकारचे चुकीचे वातावरण तयार होईल.' जर सत्य पुढे आले तर चुकीचे वातावरण तयार होतं? वस्तुस्थिती समोर आली तर देशात अस्वस्थता येईल, असे प्रश्न पवारांनी उपस्थित केले. जर असं कुणाला वाटतं असेल तर ते करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. कारण त्याच्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही. यासाठी जागृती आणि ऐक्याची आवश्यकता आहे. हेच काम आपल्याला करायचे आहे,'' असं पवारांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com