...ही त्यांची खरी मळमळ आहे! आरक्षणावरून शरद पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत आयोजित केलेल्या ओबीसी अधिवेशनात पवारांनी टीका केली.
...ही त्यांची खरी मळमळ आहे! आरक्षणावरून शरद पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल
Devendra Fadnavis-sharad Pawar | Sharad Pawar News Updatessarkarnama

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपवर टीकास्त्र सोडलं. महाविकास आघाडीने धोका दिला, असं माजी मुख्यमंत्री सांगतात पण पाच वर्ष राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना तुम्ही झोपला होता का, असा सवाल पवारांनी केला. (NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत आयोजित केलेल्या ओबीसी अधिवेशनात पवारांनी टीका केली. ते म्हणाले, ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे, या भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस एकदम स्पष्ट आहे. त्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे. आज भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री सांगतात की, महाविकास आघाडीने धोका दिला. पण पाच वर्ष राज्यात आणि अनेक वर्ष केंद्रात सत्ता असताना तुम्ही झोपला होता का, हा प्रश्न कुणी विचारला तर त्याचं उत्तर द्यावं लागेल. (Sharad Pawar criticizes Devendra Fadnavis)

Devendra Fadnavis-sharad Pawar | Sharad Pawar News Updates
होऊन जाऊ द्या! जातनिहाय जनगणनेसाठी आता पवारांचाच पुढाकार

त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण त्यांची खरी मळमळ आहे ही आहे की, या वर्गाला काही मिळालं तर आपल्या खांद्याला खांदा लावून पुढे येईल. ज्यांना हे मंजूर नाही, त्यांच्याकडून या प्रश्नाची सोडवणूक केली जाणार नाही. केवळ त्यांच्याकडून टीका केली जाते, असं पवार म्हणाले.

आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका नकोत अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. इतर दोन्ही पक्षांचेही सहकार्य आहे. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा व इतर निवडणुकांमध्ये आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावूनच निवडणुका घेतल्या जाव्यात. त्यांना सत्तेत बरोबर घेऊन राज्याचा कारभार करण्याची भूमिका राष्ट्रवादी व मित्रपक्षांची आहे. हे चित्र महाराष्ट्रापुरते संपूर्ण देशात निर्माण करण्यासाठी एकत्र येऊयात, असं पवारांनी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis-sharad Pawar | Sharad Pawar News Updates
एकत्र लढण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता, मग दोन दिवसांत मध्य प्रदेशनं असं काय केलं?

बिहारमधील नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मित्रपक्ष असलेल्या भाजपलाही जुमानले नाही. त्याचाच आधार घेत पवार यांनी जातनिहाय जनगणनेबाबत आक्रमक भूमिका घेतली. एकदा कळू द्या देशाला की नक्की किती संख्या आहे. त्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल, वेळप्रसंगी रस्त्यावर यावे लागेल, असं पवार म्हणाले आहेत.

अधिवेशनात ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावाचा संदर्भ देत पवार म्हणाले, ओबीसींची नक्की लोकसंख्या किती, याबाबतची शंका उपस्थित केली जाते. केंद्र सरकारने ओबीसींची जातीय जनगनणा करावी, असा ठराव आज केला आहे. एकदा कळू द्या देशाला की नक्की किती संख्या आहे. ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथे कुणी फुकट काही मागायला येत नाही. न्यायाचा जो अधिकार आहे, तो मिळाला पाहिजे. तो किती मिळाला पाहिजे हे ठरवायचं असेल तर जनगणनेशिवाय गत्यंत्तर नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in