राष्ट्रवादीचे बिहार निवडणुकीसाठी तब्बल 40 स्टार प्रचारक : शिवसेनेच्या दुप्पट संख्या - ncp appoints 40 star campaigner for Bihar election | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे बिहार निवडणुकीसाठी तब्बल 40 स्टार प्रचारक : शिवसेनेच्या दुप्पट संख्या

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

शिवसेनेने 20 स्टार प्रचारक नेमले आहेत. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिहारची निवडणूक लढवणार असून  प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीचे मुख्य स्टार प्रचारक राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब असतील, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांना दिली. 

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी पक्षाच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती कशी असेल याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक लवकरच माध्यमांशी संवाद साधतील, असेही  तपासे म्हणाले.

बिहार निवडणुकीतील ४० स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, फौजिया खान, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय सचिव राजीव झा, राष्ट्रीय सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, राष्ट्रीय महासचिव के. के. शर्मा, राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग, राष्ट्रीय सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव, राष्ट्रीय सचिव के. जे. जोसेमन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांचा समावेश आहे.

याशिवाय अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, राष्ट्रीय सरचिटणीस पुष्पेंद्र मलिक, राष्ट्रीय सरचिटणीस सीमा मलिक, सहकार विभाग राष्ट्रीय अध्यक्ष विरेंद्र सिंग, सफाई कामगार सेल राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार, हरियाणा प्रदेशाध्यक्ष वेदपाल चौधरी, उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव, अॅड. एस. पी. शर्मा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीमनोहर पांडे,  बिहारचे माजी प्रदेशाध्यक्ष नवलकिशोर साही, बिहारचे प्रदेशाध्यक्ष राहत काद्री, बिहार अनुसूचित जाती/जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र पासवान, बिहारच्या माजी प्रदेशाध्यक्ष ललिता सिंग, बिहार कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष संजय केशरी, बिहारचे माजी सरचिटणीस इस्तियाक आलम, बिहारचे प्रदेश सरचिटणीस अकबर अली, बिहारचे माजी प्रदेश सरचिटणीस मनोज जैस्वाल, बिहार आयटी सेलचे अध्यक्ष खुशारो आफ्रीदी, राष्ट्रीय किसान काँग्रेसचे माजी प्रद्श सरचिटणीस ब्रिजबिहारी मिश्रा, बिहारचे माजी प्रदेश सरचिटणीस शकील अहमद, बिहारचे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अझर आलम, बिहार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष इंदू सिंग, बिहार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे चांदबाबू रहेमान, बिहार माजी सरचिटणीस चंद्रेश कुमार, बिहार माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख