काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत मुख्यमंत्र्याचा दुजाभाव ; निधीबाबत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९४१ कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे.
mahesh tapase, eknath shinde
mahesh tapase, eknath shindesarkarnama

मुंबई : राज्यात शिंदे सरकार (eknath shinde) आल्यानंतर ठाकरे सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या (ncp) आमदारांसोबत दुजाभाव केला,' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांच्याकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार शिवसेना आमदारांची होती. याबाबत या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. पण या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने या आमदारांमध्ये नाराजी होती. १६ तारखेला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९४१ कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे.

एकनाथ शिंदे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निधीबाबत आरोप करीत होते त्याच एकनाथ शिंदेंनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत दुजाभाव केला, असे तपासे म्हणाले.

मार्च ते जून 2022 मधील दरम्यान मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यात एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. या कामांना स्थगिती दिल्यामुळे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांनी दणका दिल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिली आहे, तर शिवसेना आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र अभय देण्यात आला आहे.

महेश तपासे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीत नगर विकास विभागाने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिलेला निधी थांबवला आहे. यातून जाणून बुजून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत दुजाभाव करण्याचा प्रयत्न केला आहे.शिवसेना आमदारांचा निधी रोखला नाही,"

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील कामांना यापूर्वी शिंदे सरकारचा दणका दिला आहे, डीपीडीसीच्या ५६७.८ कोटींच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in