होय, आम्ही शिवसेना समर्थक आमदारांना संपर्क केला : अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना दिली कबुली

Shivsena | NCP | Congress : दोन्ही काँग्रेसकडूनचं शिवसेनेचा गेम?
Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb Thorat
Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb ThoratSarkarnama

मुंबई : होय, आम्ही (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने) शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांना विधान परिषदेच्या पाठिंब्यासाठी फोन केला होता, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. आपण स्वतः मुख्यमंत्री महोदयांना ही गोष्ट सांगितली, यात लपवण्यासारखं काहीच नव्हतं, असे म्हणतं पवार यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली. उस्मानाबाद जिल्हयातील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना (Shivsena) समर्थक आमदारांना फोन केला म्हणून मुख्यमंत्री नाराज आहेत, अशा बातम्या खऱ्या आहेत का? असा सवाल उपस्थित पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले, माझा त्यादिवशी बारामतीला कार्यक्रम होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ओबीसी आरक्षण आणि इतर गोष्टींबाबत बैठकीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी स्वतः त्यांना याबाबतची माहिती दिली. मी म्हटलं. तुमचे ५५ आणि इतर ४-५ असे ६० आमदार होतात. मागच्यावेळी झालेला दगाफटका लक्षात घेवून आता ताकही फुंकून पित आहोत. त्यामुळे ३०-३० चा कोटा ठेवला तरी ६० होतात. त्यामुळे वरील अतिरिक्त आमदारांची जी मत आहेत, म्हणजे ज्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे, पण महाविकास आघाडीसोबत आहेत, अशा आमदारांना फोन लावला. (Vidhan Parishad Election Maharashtra latest News)

अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील सांगितले की, आम्ही पण फोन केला. यात लपविण्यासारखं काहीच नव्हतं. आम्ही आता एकत्र काम करत आहे. शिवाय ज्यांना फोन केला होता त्यांनी मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करु असेच सांगितले असल्याचेही अजित पवार म्हणाले. (Vidhan Parishad Election Maharashtra latest News)

या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की आता सध्या प्रत्येकाने आपआपल्या परिने तयारी करावी, पण अगदी अंतिम क्षणी सांगु की कोटा कितीचा ठेवायचा आणि त्यानंतर आपण ठरवू किती मत वळवयाची, असे ठरले असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. शिवाय आमचा एवढ्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता आम्हाला थोडीशी मते तरी मिळतील ना? असा टोलाही अजित पवार यांनी प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com