NCP News : अजितदादांना डिवचणाऱ्या राणेंना राष्ट्रवादीनं फटकारलं ;"उंची आणि लायकी पाहून.."

Suraj Chavan : भाजप-हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Suraj Chavan, Nitesh Rane
Suraj Chavan, Nitesh Ranesarkarnama

Suraj Chavan : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. भाजप-हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर उतरली आहे. (NCP Ajit Pawar News update)

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टि्वट करीत अजित पवारांवर जहरी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते,राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चव्हाण यांनी याबाबत टि्वट केलं आहे.

Suraj Chavan, Nitesh Rane
Nitesh Rane : "धरणवीर” यांना “धर्मवीर” कसे समजणार ...; राणेंनी अजितदादांना डिवचलं

“नितेश राणे यांनी आपली “उंची”आणि लायकी पाहून अजित दादा पवार यांच्यावर टीका करावी अन्यथा धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल”,असा इशाराही यावेळी सूरज चव्हाण यांनी टि्वटमधून दिला आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या या टीकेला नितेश राणे काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Suraj Chavan, Nitesh Rane
Nana Patole : भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही बारामतीत लक्ष घातले....

नितेश राणे यांनी धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही,अशी टीका अजित पवारांना उद्देशून केली.दरम्यान,नितेश राणेंच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते,युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

"छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे," अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.

Suraj Chavan, Nitesh Rane
Pune News : धक्कादायक : शंभर रुपयांसाठी विद्यार्थ्यावर हल्ला ; हात मनगटापासून निखळला..

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांचे वक्तव्य हे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' अशा पद्धतीचे असल्याचं म्हटलं. आपण चुकीचे बोललो हे अजित पवारांच्या लक्षात येईल. संभाजी महाराज हे कालही धर्मवीर होते, आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरपर्यंत राहतील," असं शंभूराज देसाई यांनी माध्यमांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in