आव्हाडांच्या अटकेनंतर NCP आक्रमक; हजारो कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी

Jitendra Awhad : पोलिसांची होतेय दमछाक
Jitendra Awhad, NCP, Thane police, Latest News
Jitendra Awhad, NCP, Thane police, Latest News Sarkarnama

मुंबई : ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले होते आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद केला होता.यामुळे यावेळी मोठा राडा झाला होता. याप्रकरणी आव्हाड यांच्यासह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, आज आव्हाडांना (ता.११ नोव्हेंबर) वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले आणि अटक करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून हजारोंच्या संख्येंने कार्यकर्ते वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर जमले असून आव्हाडाच्या अटकेचा विरोधात घोषाबाजी केली जात आहे.

(Dr. Jitendra Awhad, NCP, Thane police, Latest News)

Jitendra Awhad, NCP, Thane police, Latest News
कॉंग्रेसला विरोध ही आमची चूकचं..इंदिरा गांधींना 'त्या' चुकीची शिक्षा मिळाली होती : दक्षिणायन

आपण चांगल्या कामासाठी आंदोलन केले होते. यामुळे मी या प्रकरणी जामीनही मागणार नाही. राज्य सरकार पोलिसांवर दबाव टाकत असून हा सत्तेचा दुरूपयोग सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, आधी माझ्यावर लावलेल्या कलमांवरून मला अटक होऊ शकत नव्हती. मात्र, आता माझ्यावरील कलम वाढवण्यात आली असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला होता.

Jitendra Awhad, NCP, Thane police, Latest News
अर्धापुरात फुलांची उधळण करीत राहुल गांधींचे जल्लोषात स्वागत...

दरम्यान, आव्हाडांना (Jitendra Awhad) अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. सध्या आव्हाड वर्तकनगर पोलीस ठाण्यात असल्याने ठाण्याबाहेर हजारोंच्या संख्येंने कार्यकर्ते जमले असून ते घोषणा देत आहेत. यामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला असून पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी येथील काही कार्यकर्तांना ताब्यात घेतले असून काहींना परिसराबाहेर काढण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com